दि. १६-१७-१८ नोव्हेंबर, २०२४ रोजी नांदेड येथे भरणाऱ्या ५९व्या वार्षिक अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनात मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराच्या यंदाच्या दुसऱ्या वर्षाच्या डॉ. रघुनाथ माशेलकर पुरस्कारासाठी (जीव आणि वैद्यकशास्त्र सोडूनची सर्व शास्त्रे) ५ नावे निवड समितीने सुचवली होती तर डॉ. कमला सोहोनी पुरस्कारासाठी (जीव आणि वैद्यकशास्त्र) ६ नावे निवड समितीने सुचवली होती. त्यातून निवड समितीने खालील चार जणांना प्रत्येकी २.५१ लाख रुपयांचा पुरस्कार द्यायचा निर्णय घेतला.
डॉ. रघुनाथ माशेलकर पुरस्कार :
१) प्रा. रोहिणी गोडबोले, बंगलोर (प्रोटोन-फोटोन-न्युट्रॉन रचना)
२) डॉ. अजय सूद, दिल्ली (अती शीत पदार्थ)
डॉ. कमला सोहोनी पुरस्कार :
१) डॉ. माधव गाडगीळ, पुणे (पर्यावरण रक्षण)
२) डॉ. महताब बामजी, हैदराबाद (बी जीवनसत्त्व)
या स्पर्धेसाठी प्रा. जे. बी. जोशी, प्रा. सुधीर पानसे, श्री. अ. पां. देशपांडे, डॉ. रजनी भिसे, डॉ. संजय ओक, प्रा. अरविंद नातु आणि डॉ. कृष्णा सैनिस यांच्या निवड समितीने काम केले.