उत्तम विज्ञान पुस्तक पारितोषिक २०२४ जाहीर

नाशिकच्या विज्ञान लेखक संघाने पुरस्कृत केलेल्या विज्ञानविषयक मराठीतील पुस्तकाला परिषदेतर्फे दरवर्षी पारितषिक दिले जाते.यावर्षी जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यान प्रकाशित झालेली विज्ञान पुस्तके पात्र होती. यासाठी ११ पुस्तके प्रवेशिका म्हणून आली होती.  त्यातून १० नियमानुसार वैध ठरली.

या पारितोषिकासाठी परीक्षणाचे काम कार्यवाह श्री. अ. पां.देशपांडे व डॉ. किशोर कुलकर्णी (विज्ञान लेखक व आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी) यांनी केले.  डॉ.आनंद जोशी व श्री.सुबोध जावडेकर  लिखित “आपले वर्तन – आपला मेंदू”  (प्रकाशक :राजहंस प्रकाशन) या पुस्तकाची निवड पारितोषिकासाठी केली. हे पारितोषिक रू. १,००० आणि प्रमाणपत्र या स्वरूपाचे आहे.

परिषदेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिन  कार्यक्रमात  रविवार दि. २७ एप्रिल २०२५ रोजी पारितोषिक प्रदान केले जाईल.