वैद्यक विषयावरील पुस्तकांसाठी पारितोषिके

मराठी विज्ञान परिषदेतर्फे वैद्यक विषयावरील मराठीतील पुस्तकांना दर तीन वर्षातून एकदा डॉ. रा. वि. साठे, डॉ. टी. एच. तुळपुळे व डॉ. चंद्रकांत वागळे यांच्या नावाने ही पारितोषिके दिली जातात. प्रत्येकी रू. ७५००/- व प्रमाणपत्र या असे पारितोषिकांचे स्वरूप आहे. यावेळी २०२२, २०२३ व २०२४ या वर्षात प्रकाशित झालेली पुस्तके पात्र असून अनुवादित वा हस्तलिखित पुस्तके विचारात घेतली जाणार नाहीत. पुस्तकाच्या  प्रत्येकी दोन प्रती मराठी विज्ञान परिषद विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२ या पत्त्यावर दि. १५ जुलै, २०२५ पर्यत पाठवाव्या.