सुधाकर उध्दवराव आठले पुरस्कार (२०२६)

समाजामध्ये विज्ञानप्रसार करुन, तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न (किमान दहा वर्षे) करणाऱ्या व्यक्तीला (साठ वर्षाखालील) मराठी विज्ञान परिषदेतर्फे सुधाकर उध्दवराव आठले पुरस्कार देऊन गौरवले जाते. रु.२५,००० आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डिसेंबर २०२५ अखेर साठ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्ती या पुरस्कारासाठी अर्ज करु शकतात. अर्जात कामाचे स्वरूप व कार्यक्षेत्र, निवडक छायाचित्रे व कात्रणे,पुरस्कार इत्यादी माहितीचा अंतर्भाव असावा. जन्मतारखेचा उल्लेख असलेल्या ओळखपत्राची प्रत  जोडावी.

अर्ज पाठवण्याची अंतिम मुदत दि.२८ फेब्रुवारी २०२६ आहे.

पत्ता : मराठी विज्ञान परिषद,विज्ञान भवन, राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेसमोर, वि.ना.पुरव मार्ग, शीव- चुनाभट्टी (पूर्व) मुंबई – ४०००२२.
दूरध्वनी : (०२२) ४८२६ ३७५०/ ४८२६ ००९४  भ्रमणध्वनी : ९९६९१००९६१ (सकाळी ११ ते सायंकाळी ५, साप्ताहिक सुट्टी मंगळवार खेरीज)
इमेल : officer1.patrika@mavipa.org