विज्ञानप्रेमींस नमस्कार !
मराठी विज्ञान परिषदेच्या स्थापनेला २४ एप्रिल २०२६ रोजी ६० वर्ष झाली. या कालावधीत समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांकडून परिषदेला भरघोस पाठींबा आणि विविध प्रकारे सहकार्य सतत मिळत आले आहे. त्यामुळे परिषद संपूर्ण महाराष्ट्रात तिच्या ६०हून अधिक विभागांतून/शाखांमार्फत विज्ञान प्रचार आणि प्रसाराचे कार्यक्रम राबवू शकली आहे. त्यांपैकी काही कार्यक्रमांत काही वेळा तुम्हीसुद्धा सहभाग घेतला असेल, किंवा त्यांबद्दल जाणून घेतले असेल. परिषद नियमितपणे राबवत असलेल्या अशा ३० प्रमुख कार्यक्रमांची यादी तुमच्या माहितीसाठी पुढे दिली आहे.
काळानुसार परिषद नियमितपणे आपल्या कार्यक्रमांत सुधारणा करत आली आहे. परिषद आता पुढील १५ वर्षांचा विज्ञान प्रसाराचा आराखडा ‘मविप २०४१’ तयार करत आहे. त्या संदर्भात सध्याच्या कार्यक्रमांबद्दल तुमचे विचार व सूचना, तसेच भविष्यातील नवीन कार्यक्रम आणि ते राबवण्याच्या अभिनव कल्पना परिषदेला मौलिक ठरतील, याची आम्हाला खात्री आहे. या उद्देशाने आम्ही एक प्रश्नावली तयार केली आहे. आपण खाली दिलेली प्रश्नावली भरून परिषदेकडे शक्य तितक्या लवकर पाठवून द्यावी, ही विनंती!
सदर प्रश्नावली सहसा १० ते १५ मिनिटांत भरता येईल, अशी आहे. तुम्ही दिलेली माहिती गोपनीय राहील आणि तुमच्या नावाचा किंवा संपर्क तपशिलाचा उल्लेख कुठेही होणार नाही याप्रकारे तिचे सादरीकरण केले जाईल असे आम्ही आश्वासन देतो. तरी तुमचा अमूल्य वेळ देऊन आम्हांला “मविप २०४१ कृतीशील आराखडा” तयार करण्यात सहकार्य करावे, ही विनंती.
आपले मनापासून आभार !
प्रा. जे. बी. जोशी (अध्यक्ष, मविप)