मराठी विज्ञान परिषदेतर्फे १९९८ सालापासून मराठी माध्यमातून, तर २००४ सालापासून इंग्रजी माध्यमातून पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा घेतल्या जातात.
कोविड-१९ मुळे स्थगित ठेवलेल्या या परीक्षा २०२३-२४ वर्षात पुन्हा सुरु करत आहोत.
इयत्ता सातवी, आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांकरिता या परीक्षा घेण्यात येतात, पण प्रौढांनाही परीक्षेला बसायला मुभा आहे.
अभ्यासक्रमावरील प्रश्नोत्तरांबरोबर, प्रयोग, पुस्तक परीक्षण, छोटे प्रकल्प इत्यादी बाबींचा समावेश असतो.
मराठी व इंग्रजी, या दोन्ही माध्यमांसाठी रु. १,०००, रु. ८०० आणि रु. ६०० अशा रकमांची प्रत्येकी तीन पारितोषिके गुणानुक्रमे, प्रत्येक परीक्षेसाठी देण्यात येतात. पारितोषिकांसाठी त्या-त्या इयत्तांतील विद्यार्थीच पात्र असतात, प्रौढ नाहीत.
सर्व देवाणघेवाण पोस्टाने होत असल्याने सगळ्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा.
विज्ञान परीक्षांसाठी शुल्क :
मराठी माध्यम —
प्रथमा (इयत्ता सातवी) : रु. २२५/-
द्वितीया (इयत्ता आठवी) : रु. २५०/-
आणि तृतीया (इयत्ता नववी) : रु. २७५/-
इंग्रजी माध्यम —
प्रायमरी (सातवी) : रु. २७५/-
सेकंडरी (आठवी) : रु. ३००/-
आणि फायनल (नववी) : रु. ३२५/-
परीक्षा शुल्काची रक्कम ‘मराठी विज्ञान परिषद’ (Marathi Vidnyan Parishad) या नावाने मनिऑर्डर किंवा बहुशहरी धनादेशाद्वारे पुढील पत्त्यावर पाठवावी :
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि.ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई – ४०००२२. नोंदणीसाठी अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट, २०२३ हा आहे.
शुल्क ऑनलाइन जमा करावयाचे असेल, तर https://razorpay.me/@marathividnyanparishad या लिंकवर क्लिक करा.
येथे Amount भरा, आपल्याला कोणती परिक्षा द्यायची आहे व ती कोणत्या माध्यमात द्यायची आहे, ते लिहा आणि Online Payment करा.
Payment झाल्यावर Payment ID आमच्याकडे इ-मेलन पाठवा.