Programs

विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा (२०२३)

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत संशोधनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी ‘विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा’ घेतली जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी (गणितासह) संबंधित कोणताही प्रकल्प या स्पर्धेसाठी पाठवता येतो. स्पर्धेसाठी आलेल्या प्रकल्पांतून तीन सर्वोत्तम प्रकल्पांची निवड करून, त्यासाठी प्रत्येकी रु. १२,००० इतक्या रकमेचे तीन पुरस्कार देण्यात येतात. हे प्रकल्प ज्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले गेले असतील, त्या तज्ज्ञांनाही रु. २,००० इतक्या रकमेचे पारितोषिक देऊन गौरवण्यात येते. […]

Programs

वार्षिक विज्ञान निबंध स्पर्धा – २०२३

डिजिटायझेशनचा उपयोग शिक्षणात चांगल्या प्रकारे कसा करता येईल, तसेच प्रत्यक्ष अनुभव, एकमेकांशी संवाद, क्षेत्रभेटी यांचा समावेश कसा करता येईल, याविषयी विचार निबंधात अपेक्षित आहेत. […]

Programs

वैद्य रघुनाथशास्त्री गो. तांबवेकर विज्ञान रंजन कथा स्पर्धा २०२३

ज्ञानरंजन साहित्य (सायन्स फिक्शन) हे भाषा साहित्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. पाश्च्यात्यांकडे ज्यूल्स व्हर्न, एच.जी.वेल्स, आयझॅक असिमोव्ह, तर आपल्याकडे डॉ. जयंत नारळीकर, श्री लक्ष्मण लोंढे, डॉ.बाळ फोंडके आदी लेखकांनी असे उत्कृष्ट साहित्य निर्माण केलेले आहे. या कार्याला चालना देण्यासाठी मराठी विज्ञान परिषद १९७० सालापासून विज्ञान रंजन कथा स्पर्धा सातत्याने आयोजित करत आहे. […]

EBooks

गणितासंगे प्रवास

गणितासंगे प्रवास लेखक – मेधा लिमये, विवेक पाटकर, माणिक टेंबे लोकसत्तामधील 2021 सालच्या कुतुहल मधील लेखांचा संग्रह