बालवैज्ञानिक अभ्यासक्रम – २०२६ (ऑनलाईन)

विज्ञान-तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, दैनंदिन जीवनातील उदाहरणे देत विज्ञान विषय  शिकवल्यास विद्यार्थ्यांना त्याचे सहजरित्या आकलन होऊन त्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहते. विज्ञान शिक्षणातून विद्यार्थ्यांचे तार्किक कौशल्य विकसित केल्यास ते त्यांना नेहमीच्या जीवनात आणि वेगवेगळ्या स्पर्धांसाठी उपयुक्त ठरते. पालकांच्या  व  विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मराठी परिषद परिषदेने ऑनलाईन पद्धतीने झूमवर विद्यार्थ्यांसाठी बालवैज्ञानिक अभ्यासक्रम २०२६चे आयोजन केले आहे.  विज्ञान संकल्पनांचा पाया मजबूत करून  ‘डॉ. होमी  भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा २०२साठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि परीक्षेकरिता त्यांची तयारी करून घेणे हे या बालवैज्ञानिक अभ्यासक्रमाचे उद्देश आहेत. सी.व्ही.रामन, महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा, राष्ट्रीय विज्ञान ऑलिंपियाड, इत्यादी स्पर्धा परीक्षांसाठीसुद्धा हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे.

अभ्यासक्रमाचे उद्देश:

  • विद्यार्थ्यांना विज्ञानातील पायाभूत संकल्पनाचे आकलन सविस्तर होण्यास मदत करणे. विद्यार्थ्यांमधील चौकसबुद्धीला आणि  विवेचनात्मक विचारांना प्रोत्साहन देणे.
  • विद्यार्थ्यांचा तार्किक विचार कौशल्य आणि वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे.
  • डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेच्या लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांची तयारी करून घेणे.

अभ्यासक्रमाचा तपशील:

  • पात्रता : इयता ५वीचे /ग्रेड ५चे  विद्यार्थी (महाराष्ट्र बोर्ड, सीबीएसई, आयसीएसई, आयबी, इतर राज्यांचे बोर्ड)
  • कालावधी : ३० रविवार, सकाळी ११ ते दुपारी १ (जानेवारी ते ऑक्टोबर २०२६)
  • माध्यम : इंग्रजी
  • शुल्क : ६०००/- प्रति विद्यार्थी
  • समाविष्ट विषय: बालवैज्ञानिक अभ्यासक्रम २०२६ मध्ये (ऑनलाईन) खालील ४० उपविषयांचा समावेश करण्यात येणार आहे:

भौतिकशास्त्र (Physics): मापन, आकारमान , वस्तुमान, घनता, वजन, गतीचे प्रकार आणि मापन (अंतर, विस्थापन, वेग, चाल, त्वरण), बलांचे प्रकार, घर्षणबल, कार्य आणि ऊर्जा, स्थितिक विद्युत, धाराविद्युत, ध्वनी, प्रकाश, उष्णता, चुंबकत्व, विद्युतचुंबकत्व, साधी यंत्रे, पदार्थ सभोवतालचे – अवस्था आणि गुणधर्म , मूलद्रव्य व संयुग, शुद्ध पदार्थ व मिश्रणे, मिश्रणातील घटक वेगळ्या करण्याच्या पद्धती.

रसायनशास्त्र (Chemistry): धातू, अधातू व धातूसदृश्य, बदलांचे प्रकार, आम्ल आम्लारी क्षार आणि दर्शके, कार्बनी आणि अकार्बनी संयुगे.

जीवशास्त्र (Biology): सजीवांची लक्षणे, सजीवांचे वर्गीकरण, पेशी व ऊती, वनस्पतीचे भाग, वनस्पतींच्या भागांमध्ये होणारे बदल, मानवसंस्था, अन्न घेण्याच्या पद्धती, प्रजननाच्या पद्धती, श्वसनाच्या पद्धती, अन्न व आहार, अन्नसुरक्षा, रोग, प्राण्यांमधील अनुकूलन, इत्यादी.

सामान्य विज्ञान (General Science): पर्यावरण, नैसर्गिक संसाधने (पाणी, हवा, माती), जैव-भू-रासायनिक चक्रे (पाणीचक्र, नायट्रोजन, कार्बन व ऑक्सिजन चक्र), मानवनिर्मित पदार्थ, आपत्ती व्यवस्थापन, विश्वाचे अंतरंग, सूर्यमाला,  प्रथमोपचार.

  • विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य (विषयांच्या पीपीटी, नोट्स, बहुपर्यायी प्रश्नपत्रिका) गुगल ड्राईव्हवर सामायिक केले जाईल.
  • या अभ्यासक्रमासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना ‘बालवैज्ञानिक प्रयोग कार्यशाळेसाठी २५% सवलत दिली जाईल.
  • बालवैज्ञानिक अभ्यासक्रम मराठी माध्यमातून हवे असल्यास मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.


Young Scientist Course (Online)

Considering the impact of science & technology in daily life, while teaching with day to day examples, students can understand science subject easily and remember it for long time. Logical thinking skill can be developed through the learning science, which is useful in daily life and for competitive exams. Marathi Vidnyan Parishad is offering an Online Young Scientist Course 2026 on Zoom platform on the demand of parents and students. This course aims to provide students with strong foundation in science concepts & theories and guidance for preparation of Dr. Homi Bhabha Competition Written Examination 2026. This course is also helpful for other exams like CV Raman, Talent Search Exam, National Talent Search Exam, and National Science Olympiad.

Course Goals:

  • To help the students to understand basic science concepts thoroughly. Encourage curiosity and critical thinking among students.
  • To develop logical thinking and a scientific mindset and broaden students understanding.
  • To guide the students for preparation of Dr. Homi Bhabha Balvaidnyanik Competition 2026 written exam and motivate students to pursue careers in science & research.

Course Details:

  • Eligibility: Grade 5/ Standard 5 students (SSC, CBSE, ICSE, IB, Other state boards)
  • Duration: 30 Sundays, 11am to 1pm (From January to October 2026)
  • Medium: English
  • Fees: Rs. 6000/- per student
  • Topics Covered: The Young Scientist Course-2026 (Online) will cover the following 40 topics:

Physics: Measurement, volume, mass, density, weight, types of motion & measurement (distance, displacement, speed, velocity, acceleration), types of force, friction force, energy & work, static & current electricity, sound, light, heat, magnetism, electromagnetism, simple machines, matter and its properties, elements & compounds, pure substances & mixtures, separation methods.

Chemistry: Metals, nonmetals & metalloids, changes, acids, bases salts & indicators, organic and inorganic substances.

Biology: Characteristics of living things, classification of living things, cells and tissues, parts of plant, modification in plant, human systems, modes of nutrition, modes reproduction and modes of respiration, food & diet, food safety, disease, adaptations in animals etc.

General Science: Environment, natural resources (water, air, soil), biogeochemical cycles (water, nitrogen, General Science: carbon & oxygen), manmade materials, disaster management, the universe, solar system, first aid.

  • Study material (ppt, notes, MCQs question papers) will share on Google drive to students.
  • Students who registered this course, will get 25% concession in practical workshops which will be arranged after the result of Homi Bhabha Balvaidnyanik Competition’s written exam.
  • The student who wants Young Scientist Course in Marathi Medium, please contact to Marathi Vidnyan Parishad’s office.

Students who complete the course will get a certificate.