Innovative thinking requires courage to explore new methods, techniques, and uncharted paths. It also demands the wisdom to operate within available resources. This form of thinking cannot be taught in a conventional way—it must be nurtured through hands-on learning.
To encourage this, ‘Marathi Vidnyan Parishad’ and ‘Nehru Science Centre’ have jointly organised,
‘Exercise in Innovative Thinking.’
Here, students develop their own experimental procedures using apparatus supplied to explore scientific concepts they have already studied. No spoon-feeding—just minimum guidance from trained, enthusiastic volunteers.
Join and experience our ‘Exercise in Innovative Thinking.’
For students of Std. VII, VIII, IX, X.
Interaction with students in Marathi, Hindi, and English.
Batches on week-ends:
Batch 1: 11.00am to 1.00pm
Batch 2: 2.00pm to 4.00pm
Each batch accommodates 20 students.
Participation fee: Rs. 200/- per student.
Special batches for schools can be arranged on weekdays.
Engage in hands-on science activities that foster creativity and innovative thinking.
Secure your spot now: Registration Here
Venue: Nehru Science Centre
(A unit of National Council of Science Museums)
Dr. E.Moses Road, Worli, Mumbai – 400 018.
Google Map
School authorities may contact:
- Dhanaji : 8879695915 (Marathi Vidnyan Parishad)
- Rupesh Gaikwad: 9867879484 (Marathi Vidnyan Parishad)
- Manjula Yadav: 02231059024, (Nehru Science Centre Mumbai)
‘नव-निर्मिती विचारक्षमता निर्माण करणे’ उपक्रम
नवनिर्मिती-विचारक्षमता निर्माण होण्यासाठी नवीन पद्धती व नवीन तंत्रे यांचा स्वीकार करण्याचे धैर्य असावे लागते, आणि नव्या वाटा धुंडाळण्याचे धाडस आवश्यक असते. उपलब्ध संसाधनांच्या मर्यादेत क्रियाशील रहाण्याचा सुजाणपणाही त्यासाठी आवश्यक असतो. असा विचार करण्याची पद्धत शिकवता येत नाही, ती शिकता येते. प्रत्यक्ष अनुभव घेत, त्यातून ती आत्मसात करावी लागते.
यासाठी ‘मराठी विज्ञान परिषद’ आणि ‘नेहरू विज्ञान केंद्र’ यांनी संयुक्तरित्या
‘नव-निर्मिती-विचारक्षमता निर्माण करणे’
हा उपक्रम सुरु केला आहे.
येथे विद्यार्थी दिलेल्या साहित्याचा वापर करून, प्रयोगांच्या पद्धती स्वतः विकसित करण्याचा व त्यायोगे त्यांनी आधीच अभ्यासलेल्या वैज्ञानिक संकल्पनांच्या विविध पैलूंचा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न करतात. यासाठी त्यांना ‘स्पून-फीडिंग’ केले जात नाही. केवळ आवश्यकता असेल तिथेच आमचे प्रशिक्षित आणि उत्साही स्वयंसेवक मार्गदर्शन करतात.
आमच्या या उपक्रमात सामील व्हा, आणि नव-निर्मिती विचारक्षमता कशी निर्माण होते याचा अनुभव घ्या.
इयत्ता ७वी, ८वी, ९वी आणि १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी.
विद्यार्थ्यांशी मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये संवाद.
बॅचेस शनिवार-रविवारी
पहिली बॅच: सकाळी 11.00 ते दुपारी 1.00
दुसरी बॅच: दुपारी 2.00 ते 4.00
प्रत्येक बॅचमध्ये 20 विद्यार्थी.
सहभाग शुल्क: रु. 200/- प्रति विद्यार्थी.
स्वानुभवातून आणि नाविन्यपूर्ण विचारांना चालना देणाऱ्या विज्ञानविषयक उपक्रमामध्ये सहभागी व्हा.
तुमची जागा आता आरक्षित करा: नोंदणीसाठी क्लिक
स्थळ: नेहरू विज्ञान केंद्र
(नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्सची एकक संस्था)
डॉ. ई. मोसेस रोड, वरळी, मुंबई – ४०० ०१८
आठवड्यातील इतर दिवशी मागणीनुसार शाळांसाठी विशेष बॅचची व्यवस्था केली जाऊ शकते.
त्यासाठी मुख्याध्यापकांनी संपर्क करावा.
- डॉ. धनाजी : 8879695915 (मराठी विज्ञान परिषद)
- डॉ. रुपेश गायकवाड : 9867879484 (मराठी विज्ञान परिषद)
- मंजुळा यादव: 02231059024, (नेहरू विज्ञानकेंद्र मुंबई)