मोरेश्वर मुकुंदराव मोहिले पारितोषिक स्पर्धा (२०२५)

मराठी विज्ञान परिषदेतर्फे तीन वर्षातून एकदा इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प स्पर्धा घेतली जाते. या वर्षीच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या आठ जिल्ह्यातून १७ प्रकल्प आले होते. या प्रकल्पांचे परीक्षण श्री.विजय लाळे (ज्येष्ठ विज्ञान अधिकारी, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र) व श्री. अभय यावलकर (ज्येष्ठ विज्ञान प्रसारक) यांनी केले. पारितोषिकांसाठी निवडलेले प्रकल्प व विद्यार्थी पुढीलप्रमाणे :

प्रथम क्रमांक : रू. ५,००० व प्रमाणपत्र

विद्यार्थी – देवेन वानखेडे व विकास विधाते, लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय, वरोरा, जि.चंद्रपूर
प्रकल्प : जलप्रदूषण – एक जागतिक समस्या, मार्गदर्शक : श्री.आनंद मेहता

द्वितीय क्रमांक : रू. ४,००० व प्रमाणपत्र

विद्यार्थी – प्रेशिता झांबरे व खुशी चौधरी ,धनाजी नाना विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, खिरोदा, जि.जळगाव,
प्रकल्प : सेंद्रिय  खते- आधुनिक काळाची गरज, मार्गदर्शक : श्रीमती भारती बढे

उत्तेजनार्थ : रू. १,००० व प्रमाणपत्र

विद्यार्थी – श्रुती पाटेकर व तनुश्री अहिरकर, लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय, वरोरा, जि.चंद्रपूर
प्रकल्प : नैसर्गिक बीजजतन, शाश्वत शेतीचे धन, मार्गदर्शक : कु.प्रणाली मेश्राम

मार्गदर्शक शिक्षकांना विद्यार्थ्यांना दिलेल्या रकमेच्या दहा टक्के रक्कम व प्रमाणपत्र प्रोत्साहन म्हणून दिली जाते.