मराठी विज्ञान परिषदेची शिष्यवृत्ती योजना (२०२३)

मराठी विज्ञान परिषद शिष्यवृत्ती २०२३२५ निकाल
(विज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती)

जीवशास्त्र :
१. प्रणाली राजू  कुताडे  (एकनाथ सिताराम दिवेकर महाविद्यालय वरवंड, पुणे)
२. सुरेश राया वळवी (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव )

रसायनशास्त्र : 
१. अर्जुमनबानो इम्तियाज खान (कला, वाणिज्य  व विज्ञान महाविद्यालय, रहाटा – अहमदनगर)
२. पूनम बबन मुळे (कला, वाणिज्य  व विज्ञान महाविद्यालय, नारायणगाव, पुणे)

भौतिकशास्त्र : 
१. सोनाली प्रकाश भोसले (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
२. वैदेही संदिप दवंडे  (श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती)

गणित :
१. खुशाल सुरेश युवनाते (संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती)
२. खान फझीला खानम असद खान (एस.एस.व्हि.पी. संस्थेचे, डॉ.पी.आर. घोगरे विज्ञान महाविद्याल, धुळे)


पार्श्वभूमी : महाविद्यालयात शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी तसेच मराठी विज्ञान परिषदेच्या कामाला हातभार लागावा या दुहेरी हेतूने विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना आखली होती. सन १९९४-९५ या वर्षापासून मुंबईतील विद्यार्थ्यांना या योजनेत संधी दिली. पुढे या उपक्रमाची व्याप्ती वाढवत मराठी विज्ञान परिषदेच्या विभागांना चक्रीय पद्धतीने सामावून घेण्यात आले. सन २०१६ पासून या योजनेचे स्वरूप बदलत   एम.एससी भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / जीवशास्त्र / गणित, एम. ए. (गणित) ह्या अभ्यासक्रमाच्या महाराष्ट्रात शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याचे ठरले. त्यानुसार  मूलभूत विज्ञानात उच्च शिक्षण घेण्यासाठी गरजू विद्यार्थ्यांना आधार आणि प्रोत्साहन मिळावे, हा या शिष्यवृत्ती योजनेचा हेतू आहे.

शिष्यवृत्ती (२०२३-२५) साठी अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक १६ ऑक्टोबर, २०२३ होता.