वार्षिक निबंध स्पर्धा २०२५ निकाल

वार्षिक निबंध स्पर्धा २०२ (निकाल) – विभागीय आणि राज्यस्तरीय विजेते व सहभाग

विषय – १) विद्यार्थी गट (इयत्ता बारावीपर्यंत) : मोबाइलपासून मैदानाकडे, २) खुला गट : देहदान आणि अवयवदान
एकूण सहभाग (१०७२) : विद्यार्थी गट : ८७२ आणि खुला गट : २००

विभागीय विजेते :

विभाग : मुंबई व कोकण प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक सहभाग
विद्यार्थी गट सीमा भुवड (आंबवली, जि. रत्नागिरी) सफा कालसेकर (राजापूर, जि. रत्नागिरी) २१२
खुला गट प्रगती भगत (पेण, जि.रायगड) स्वप्निल झगडे (खारघर, जि. नवी मुंबई) १३६
विभाग : दक्षिण महाराष्ट्र प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक सहभाग
विद्यार्थी गट साक्षी जारकोळी (कोल्हापूर) कु.जहीन मुपगार (सांगली) ११४
खुला गट नर्मदा कनकी (सोलापूर) सुनील कांबळे (गडहिंग्लज जि.कोल्हापूर) ४२
विभाग : उत्तर महाराष्ट्र प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक सहभाग
विद्यार्थी गट कु. तनुजा शिनकर (धुळे) अनिकेत अहिरे (साक्री, जि. धुळे) ८४
खुला गट रविंद्र मोरे (चाळीसगाव, जि. जळगाव) सुनिता हंडोरे (देवपूर, जि. धुळे) ०५
विभाग : मराठवाडा प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक सहभाग
विद्यार्थी गट कु. समृध्दी मोताळे (माजलगाव, जि. बीड) कु. अदिती जाधव (लातूर) ७७
खुला गट सुशांत देऊळगावकर (नांदेड) अर्चना जवळगीकर (नाईक) (छत्रपती संभाजीनगर) ०५
विभाग : विदर्भ प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक सहभाग
विद्यार्थी गट कु. अर्णव भांबेरे (अकोला) वैष्णव निकम (आर्वी, जि. वर्धा) ३६९
खुला गट सौ. अश्विनी कुळकर्णी (बुटीबोरी, जि. नागपूर) सौ. सोनाक्षी टोंगे (वणी, जि. यवतमाळ) १२
विभाग : बृहन्महाराष्ट्र प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक सहभाग
विद्यार्थी गट कोणीही नाही कोणीही नाही १६
खुला गट ००

यापैकी विद्यार्थी गटाची पारितोषिके ‘रमाकांत टिपणीस पारितोषिके’ या नावे दिली जातात. ती अनुक्रमे रु. ८००/- व रु. ४००/- प्रत्येकी व प्रमाणपत्र या स्वरूपाची असतात. तसेच खुल्या गटाची विभागीय पारितोषिके अनुक्रमे रु. १,०००/- व रु. ५००/- व प्रमाणपत्र या स्वरूपाची असतात. राज्यस्तरीय निर्णय झाला की ही पारितोषिके मध्यवर्तीकडून विजेत्यांना पाठवली जातात.

राज्यस्तरीय विजेते :

  प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक
विद्यार्थी गट साक्षी जारकोळी (कोल्हापूर) कु. अर्णव भांबेरे (अकोला)
खुला गट सौ. नर्मदा कनकी (सोलापूर) श्री. स्वप्निल झगडे (खारघर, जि. नवी मुंबई)

विद्यार्थी गट :

  • ही पारितोषिके अनुक्रमे रु. २,०००/- व रु. १,५००/- या रकमांची असून सोबत प्रमाणपत्र दिले जाईल.
  • मविप छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे, श्री. मैत्रेय मुदकवी यांनी या राज्यस्तरीय परीक्षणाचे काम पाहिले.

खुला गट :

  • ही पारितोषिके अनुक्रमे रु. २,५००/- व रु. २,०००/- या रकमांची असून सोबत प्रमाणपत्र दिले जाईल.
  • मविप छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे, डॉ. दिलीप डांगे यांनी या राज्यस्तरीय परीक्षणाचे काम केले.