राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा – २०२३

मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षापासून म्हणजेच २०१५ पासून मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी विज्ञान एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येते. शैक्षणिक आणि खुल्या अशा दोन गटांत घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेत विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कोणत्याही विषयावर आधारलेली एकांकिका सादर करता येते.

राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा २०२३ – अंतिम फेरी निकाल

राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी दि.२३ नोव्हेंबर २०२३ रोजी साहित्य मंदीर नाट्यगृह वाशी नवी मुंबई येथे संपन्न झाली. परीक्षणाचे काम नाटयक्षेत्रातील श्री प्रमोद लिमये व श्री पंकज चेंबरकर आणि विज्ञानाच्या अंगाने  डॉ रेखा वर्तक यांनी केले. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे

शैक्षणिक गट

प्रथम क्रमांक : द फ्लायर्स
शाळा – हिंदूस्थान अँन्टिबायोटिक्स स्कूल (पिंपरी))

द्वितीय क्रमांक : ध्यासपर्व
शाळा – प्रबोधन कुर्ला माध्यमिक शाळा (कुर्ला)

तृतीय क्रमांक : चंद्रावरची स्वारी
शाळा – स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे लेआउट (नागपूर)

खुला गट

प्रथम क्रमांक : एरिका
संस्था – नाट्यकीर्ती (मुंबई)

द्वितीय क्रमांक : माझ्या शरीरावर माझा हक्क
संस्था – आगम ( पुणे)

तृतीय क्रमांक : दुसरा आइन्स्टाइन
संस्था – असोसिएशन फॉर रिसर्च अ़ॅण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन (नागपूर)

सांघिक पारितोषिके : दोन्ही गटांची प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमाकांच्या विजेत्यांना अनुक्रमे रु. ३१,०००/-, रु. २१,०००/- आणि रु. ११,०००/- या रकमांची पारितोषिके, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

वैयक्तिक पारितोषिके :  दोन्ही गटातील उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट लेखक यांना अनुक्रमे रु. ३,०००/-  आणि रु. २५००/- या रकमांची पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात आली तसेच दोन्ही गटातील उत्कृष्ट –  नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार, संगीत संयोजक, अभिनेता व अभिनेत्री यांना प्रत्येकी अशी रु. २,०००/- रकमेची वैयक्तिक पारितोषिके व प्रमाणपत्रही देण्यात आले.

पारितोषिक वितरण परिषदेचे अध्यक्ष प्रा.ज्येष्ठराज जोशी ,साहित्य मंदीरच्या उपाध्यक्ष श्रीमती अश्विनी बाचलकर, परीक्षक श्री. प्रमोद लिमये आणि श्री. रविंद्र ओंकार (अल्काइल अमाइन्स केमिकल्स लि.) यांच्या हस्ते संपन्न झाले.

एकांकिकेसाठी मुख्य आर्थिक साहाय्य अल्काइल अमाइन्स केमिकल्स लि.यांनी दिले तसेच डीएमसीसी स्पेशालिटी केमिकल्स कंपनीने पण आर्थिक मदत केली.