सफर विज्ञानाची

मराठी विज्ञान परिषदेची स्थापना १९६६ साली झाली असल्याने हे परिषदेचे साठावे म्हणजे हीरकमहोत्सवी वर्ष आहे. हीरकमहोत्सवी वर्ष आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने  सफर विज्ञानाची या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम  दि.२६, २७ व २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९:३० ते ५:०० या वेळेत परिषदेच्या विज्ञान भवनात संपन्न होईल.

सफर विज्ञानाची मधील प्रमुख दालने

  • १ नायट्रोजन शो •२ विज्ञान प्रयोग •३ विज्ञान प्रदर्शन (प्रारुपांसह) •४ गणित प्रदर्शन +विज्ञान पुस्तक प्रदर्शन आणि विक्री

या दालनांमध्ये नायट्रोजन शोचे आश्चर्यकारक प्रात्यक्षिक बघायला मिळेल, प्रयोग करायला मिळतील. गणितातील काही गमती-जमतींचा आनंद मिळेल. पुस्तक प्रदर्शनात नवनवीन पुस्तके घेता येतील.

या तीन दिवसात कधीही विज्ञान भवनात आवर्जून या, विविध विज्ञान दालनांना भेट द्या. विज्ञान जगतात समरस व्हा!