सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार २०२४ जाहीर

श्री. सुधाकर उद्धवराव आठले यांनी दिलेल्या निधीच्या व्याजातून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने एक वा अनेक मार्गांनी विज्ञान प्रसार करणाऱ्या व्यक्तीला (साठ वर्षाखालील) हा पुरस्कार देण्यात येतो.

यावर्षी या पुरस्कारासाठी पाच प्रवेशिका आल्या होत्या. प्रा.भालचंद्र भणगे, डॉ.निशिगंधा नाईक आणि श्रीमती शुभदा चौकर यांच्या परीक्षक समितीने श्री.सुशांत जगताप (चाळीसगाव) यांची निवड पुरस्कारासाठी केली आहे. पुरस्काराचे स्वरूप रू.२५,००० आणि सन्मानपत्र असे आहे. हा पुरस्कार परिषदेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात रविवार दि.२७ एप्रिल २०२५ रोजी देण्यात येईल.