मराठी विज्ञान परिषदेतर्फे मराठीतील विज्ञानविषयक उत्तम पुस्तकाला दर वर्षी पारितोषिक दिले जाते. हे पारितोषिक नाशिकच्या ‘सायन्स फिचर्स’ यांनी पुरस्कृत केलेले आहे. हे पारितोषिक रु. एक हजार व प्रमाणपत्र या स्वरूपाचे आहे. या वर्षीच्या पारितोषिकासाठी जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेली मराठीतील विज्ञानविषयक पुस्तके पात्र आहेत. पुस्तकाचे स्वरूप पाठ्यपुस्तक, हस्तलिखित,संपादित वा अनुवादित नसावे. इच्छुक लेखक व प्रकाशकांनी आपल्या पुस्तकाच्या दोन प्रती दि.२८ फेब्रुवारी २०२६ पर्यत, नाव पत्ता,भ्रमणध्वनी , इ-मेल या तपशीलासह परिषदेकडे पाठवाव्या.
पत्ता : मराठी विज्ञान परिषद,विज्ञान भवन, राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेसमोर, वि.ना.पुरव मार्ग, शीव- चुनाभट्टी (पूर्व) मुंबई – ४०००२२.
दूरध्वनी : (०२२) ४८२६ ३७५०/ ४८२६ ००९४ भ्रमणध्वनी : ९९६९१००९६१ (सकाळी ११ ते सायंकाळी ५, साप्ताहिक सुट्टी मंगळवार खेरीज)
इमेल : officer1.patrika@mavipa.org