मराठी विज्ञान परिषदेतर्फे तीन वर्षातून एकदा इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प स्पर्धा घेतली जाते. या वर्षीच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या २० जिल्ह्यातून १०३ प्रकल्प आले होते. या प्रकल्पांचे परीक्षण श्री.विजय लाळे ( ज्येष्ठ विज्ञान अधिकारी, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र) आणि श्री. अभय यावलकर (ज्येष्ठ विज्ञान प्रसारक) यांनी केले. पारितोषिकांसाठी निवडलेले प्रकल्प व विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक : रू. ४,००० व प्रमाणपत्र
विद्यार्थी – कु.अदिती जाधव व कु. स्नेहा सूर्यवंशी, जिजामाता कन्या प्रशाला, लातूर
प्रकल्प : शाळेतील पाणी समस्या, मार्गदर्शक : श्रीमती पंकजा पाटील व श्रीमती प्रतिक्षा पाटील
द्वितीय क्रमांक : रू. ३,००० व प्रमाणपत्र
विद्यार्थी – प्रचिती जाळगावकर व राणी जमदाडे, आर. एस.टी माध्यमिक विद्यालय, गोवंडी मुंबई
प्रकल्प : सॅनिटरी पॅड व कापडी पॅड यांचा तुलनात्मक अभ्यास, मार्गदर्शक : श्रीमती स्मृती वावेकर.
तृतीय क्रमांक : रू. २,००० व प्रमाणपत्र
विद्यार्थी – साईश आमणगी व ओम उत्तूरकर, श्री पार्वती शंकर विद्यालय उत्तूर जि.कोल्हापूर
प्रकल्प : अन्ननासाडी समस्या व उपाय, मार्गदर्शक : श्री.पी.एस.वंजारे
उत्तेजनार्थ पारितोषिके : प्रत्येकी रू. १,००० व प्रमाणपत्र
१) समर्थ शिंदे, जागृती हायस्कूल, गडहिंग्लज, जि.कोल्हापूर
प्रकल्प : पर्यावरणीय नैतिकता, मार्गदर्शक : श्रीमती स्मिता शिंदे
२) अथर्व भाटले व आदित्य आळवे , पार्वती शंकर विद्यालय, उत्तूर, जि.कोल्हापूर
प्रकल्प : घनकचरा समस्या आणि उपाय, मार्गदर्शक : श्री.पी. एस. वंजारे
३) तृप्ती म्हाकेकर व समृध्दी गावडे, भाई दाजिबा देसाई विद्यालय, पार्ले ता.चंदगड,दि.कोल्हापूर
प्रकल्प :सण ,उत्सवात पर्यावरण रक्षणाचे धोरण व उपाय, मार्गदर्शक : श्री.लक्ष्मण पाटील
४) आराध्या जाधव व विदिशा पाटील, नानासाहेब साहेबराव पंडित पाटील माध्यमिक विद्यालय, पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे
५) हर्षवर्धन लंकाबळे व ओम सुतार, श्री.पार्वती शंकर विद्यालय, उत्तूर, जि.कोल्हापूर, मार्गदर्शक श्री.पी.एस. वंजारे
मार्गदर्शक शिक्षकांना विद्यार्थ्यांना दिलेल्या रकमेच्या दहा टक्के रक्कम व प्रमाणपत्र प्रोत्साहन म्हणून दिली जाते.