वैद्य रघुनाथशास्त्री गो.तांबवेकर विज्ञानरंजन कथा स्पर्धा २०२३ – निकाल
मराठी विज्ञान परिषद विज्ञान रंजन कथा स्पर्धा १९७० सालापासून आयोजित करत आहे. मराठीतील बहुतेक सगळे नामवंत विज्ञान कथा लेखक ह्या स्पर्धेत भाग घेऊन त्यातील विजेतेआहेत. यावर्षी या स्पर्धेसाठी ३० विज्ञानकथा प्रवेशिका म्हणून आल्या होत्या. त्यांचे परीक्षण विज्ञान कथा लेखिका डॉ.मेघश्री दळवी आणि श्रीमती स्मिता पोतनीस यांनी केले. त्यांनी निवड केल्यानुसार विजेते पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक : डॉ.संजीव कुलकर्णी (पुणे), कथा : मीन जळीं तळमळले
द्वितीय क्रमांक : डॉ.मंगला नाडकर्णी (मुंबई), कथा : अदृश्य स्वाक्षरी
ही पारितोषिके अनुक्रमे रू.२,५०० आणि रू.२,००० व प्रमाणपत्र या स्वरूपाची आहेत.