वैद्य रघुनाथशास्त्री गो. तांबवेकर विज्ञान रंजन कथा स्पर्धा (२०२४)

वैद्य रघुनाथशास्त्री गो. तांबवेकर विज्ञान रंजन कथा स्पर्धा २०२४

‘विज्ञानकथा’ हा (सायन्स फिक्शन) भाषा-साहित्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. पाश्चात्त्यांकडे ज्यूल्स व्हर्न, आयझॅक असिमोव्ह, तर आपल्याकडे प्रा. जयंत नारळीकर, डॉ. बाळ फोंडके, श्री. लक्ष्मण लोंढे आदी लेखकांनी असे उत्कृष्ट साहित्य निर्माण केलेले आहे. मराठी विज्ञानरंजन साहित्यनिर्मितीला चालना देण्यासाठी मराठी विज्ञान परिषद १९७० सालापासून ‘विज्ञानरंजन कथा स्पर्धा’ सातत्याने आयोजित करत आहे. या वर्षीच्या स्पर्धेसाठी कथा पाठवण्याचे आवाहन परिषद करत आहे. स्पर्धकाला वयाचे बंधन नाही तसेच विज्ञान तंत्रज्ञानातील कोणताही विषय कथेसाठी निवडता येईल.

स्पर्धेसाठी पाठवलेल्या कथेला विज्ञानाची बैठक हवी आणि भाषेचे लालित्यही हवे. केवळ कथा नको किंवा केवळ विज्ञान नको, तर या दोन्हींचा मिलाफ हवा. तसेच, विज्ञानरंजन कथेतील विज्ञान हे ज्ञात सिद्धान्तांवरचे व ज्ञात वस्तूंचे हवे. ज्ञात विज्ञानाच्या पुढे जाऊन, थोड्या कल्पकतेतून भविष्यकालीन संभाव्य विज्ञानाचा मागोवा घेणारे सिद्धान्त असले तरी चालतील. कथा ओघवती असावी, तसेच वातावरणनिर्मिती चित्तवेधक व वाचकांची उत्कंठा वाढवणारी असावी. कथालेखकांनी विज्ञानाचे एखादे प्रमेय, सूत्र, संकल्पना घेऊन त्यावर आधारित कथा लिहावयाचा प्रयत्न करावा. कथेचे तपशील लेखन आणि कथाबीज फुलवणे, तसेच संपूर्ण कथेचा परिणाम, यांकडे कथालेखकांनी लक्ष द्यावे. पहिल्या दोन सुयोग्य विज्ञानरंजन कथांसाठी प्रथम क्रमांक रु. २५००/-, द्वितीय क्रमांक रु. २०००/- अशी पारितोषिके दिली जातील. पारितोषिकप्राप्त कथा मराठी विज्ञान परिषद पत्रिका मासिकात प्रकाशित करण्यात येतील.

स्पर्धेचे नियम –

१)       विज्ञानरंजन कथा स्वतःची असल्याचे प्रतिज्ञापत्र प्रत्येक लेखकाने कथेबरोबर देणे अनिवार्य आहे.

२)       स्पर्धेत कोणालाही भाग घेता येईल, मात्र ज्या व्यक्तीस या स्पर्धेत आजवर दोनदा पारितोषिक मिळाले आहे, त्यांनी आपली कथा पाठवली तरी चालेल, फक्त त्या कथेचा पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही.

३)       कथेची शब्दसंख्या किमान १००० असावी. लिखाण कागदाच्या एकाच बाजूला असावे. कथा संगणक टंकलिखित असल्यास उत्तम, कागद ए-४ आकाराचा असावा.

४)       साहित्याबरोबर लेखकाने आपले नाव व पिनकोडसह संपूर्ण पत्ता द्यावा. संपर्क भ्रमणध्वनी द्यावा. तसेच, इ-मेल पत्ता कळवावा. शीर्षकासह ही सर्व माहिती पहिल्या पानावर लिहावी.

५)       स्पर्धेसंबंधी परिषदेचा निर्णय अंतिम राहील. पारितोषिक न मिळालेले साहित्य परत पाठविले जाणार नाही. सर्व विज्ञानरंजन कथा आणि वरील नियमांप्रमाणे आवश्यक कागदपत्रे इ-मेलद्वारे पाठविता येतील.

इ-मेल : officer1.admin@mavipa.org, संकेतस्थळ : www.mavipa.org

कथा टपालाने पाठविण्याचा पत्ता : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि.ना. पुरव मार्ग,

शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२.

दूरध्वनी : (०२२) ४८२६ ३७५० / ४८२६ ००९४

 कथा पाठवण्याचा अंतिम दिनांक ३ सप्टेंबर, २०२

माहिती पीडीएफ फाईल