विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा (२०२३) – अंतिम निकाल

मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या गेलेल्या, २०२३ सालच्या विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धेत खालील तीन प्रकल्प पारितोषिकपात्र ठरले आहेत. हे प्रकल्प ज्यांनी सादर केले, त्या सर्व स्पर्धकांना एप्रिल महिन्याच्या अखेरीस साजऱ्या होणाऱ्या, परिषदेच्या वर्धापनदिनी पारितोषिके दिली जातील. सर्व विजेत्यांचे अभिनंदन!

(१) Development of intelligent and interactive glove for sign language translation using Flex sensors

(खुणांच्या भाषेचे, इतरांना समजू शकेल अशा भाषेत रूपांतर करणाऱ्या हातमोजांची निर्मिती)

दिव्या भोसले, शाहिद खान आणि इस्माइल शेख, मार्गदर्शन : प्रा. शबाना चोपदार (गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, खांडोळा, गोवा)

(२) Role of Fe2O3 Nanoparticles as a Micronutrient for Growth of Maize Plant

(लोहाच्या ऑक्साइडच्या अतिसूक्ष्मकणांचा, मक्याच्या रोपाच्या वाढीसाठी पोषक पदार्थ म्हणून वापर)

सानिका माने, मार्गदर्शन : डॉ. अरुणा भोसले (श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय, इस्लामपूर)

(३) Sustainable approach to enhance soil fertility using chitin hydrolysate obtained from microbial management of chitin rich waste

(कचऱ्यातून मिळवलेल्या कायटिनच्या वापराद्वारे जमिनीच्या सुपिकतेतील वाढ)

आर्य पेडणेकर, हर्ष जाधव आणि सेजल जोशी, मार्गदर्शन : डॉ. राधिका बिरमोळे (विल्सन महाविद्यालय, मुंबई)