महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत संशोधनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी ‘विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा’ घेतली जाते. विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणित, या क्षेत्रांशी संबंधित कोणताही प्रकल्प या स्पर्धेसाठी पाठवता येतो. स्पर्धेसाठी आलेल्या प्रकल्पांतून तीन सर्वोत्तम प्रकल्पांची निवड करून, त्यासाठी प्रत्येकी रु. १५,००० इतक्या रकमेचे तीन पुरस्कार देण्यात येतील. हे प्रकल्प ज्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले गेले असतील, त्या तज्ज्ञांनाही रु. २,००० इतक्या रकमेचे पारितोषिक देऊन गौरवण्यात येते. या स्पर्धेचे माहितीपत्रक आणि स्पर्धेसाठी भरण्याच्या ऑनलाईन अर्जाच्या जोडण्या खाली दिल्या आहेत. या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर, २०२४ ही आहे.
—————————
Science Research Contest (2024)
Marathi Vidnyan Parishad conducts Science Research Contest for undergraduate students every year. The purpose of the contest is to develop interest in science research, amongst the students. The contestants have to submit a research project, carried out in any of the branches in science or engineering, including mathematics. The three best projects will be awarded prizes of Rs. 15,000/- each. If award-winning project is carried out under the guidance of an expert, the latter is also felicitated with a special award of Rs. 2,000. Links for the details about the contest and online application form are given below. There is no entry fee for participation. Last date for application is December, 15, 2024.