मराठी विज्ञानविषयक व्यंगचित्र स्पर्धा २०२४ – निकाल

मराठी विज्ञान परिषद आणि कार्टूनिस्ट्स कम्बाइन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी विज्ञानविषयक व्यंगचित्र स्पर्धा’ या वर्षी प्रथमच घेण्यात आली. त्या स्पर्धेला प्रतिसाद म्हणून एकूण ८७ व्यंगचित्रे आली होती.पण अनेक व्यंगचित्रे विषयाला/ नियमाला धरून नव्हती. ती वगळता फक्त ३३ व्यंगचित्रे स्पर्धा नियमानुसार पात्र ठरली. त्यांचे परीक्षण विज्ञानाच्या अंगाने श्री.मकरंद भोंसले यांनी तर व्यंगचित्राच्या अंगाने श्री.संजय मिस्त्री यांनी केले. त्यांनी निवड केली ती पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक : डॉ. आशिष विखार (पुणे)
द्वितीय क्रमांक : श्री. गोपिनाथ भोसले (पुणे)
तृतीय क्रमांक : श्री. आनंद अकुंश (भाईंदर, जि. ठाणे)

ही पारितोषिके अनुक्रमे रू. ५,०००/-, रू. ४,०००/- व रू. ३,०००/- रोख आणि प्रमाणपत्र या स्वरूपाची आहेत. ही तीन विज्ञान व्यंगचित्रे ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिका ‘ या विज्ञान मासिकाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आली.याखेरीज सहा व्यंगचित्रे उत्तेजनार्थ प्रमाणपत्रासाठी निवडण्यात आली. त्या व्यंगचित्रांचे चित्रकार डॉ. अरूण इनामदार (ठाणे), श्री. गौतम दिवार (पुणे), श्री. सुरेश राऊत (यवतमाळ), श्री. योगेश चव्हाण (ठाणे), श्री. असीम कुलकर्णी (मुंबई) व श्री. आनंद शिंदे (कल्याण)