मराठी विज्ञान परिषदेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन रविवार, दि. २८ एप्रिल, २०२४ रोजी सकाळी १०.०० ते १.३० या वेळेत विज्ञान भवनामध्ये साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुनील भागवत (संचालक, आयसर, पुणे) हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात परिषदेचे ‘सु.त्रिं. तासकर’ पुरस्कार, ‘सुधाकर उद्धवराव आठले’ पुरस्कार, ‘मनोरमाबाई आपटे’ पुरस्कार, ‘तीन विज्ञान संशोधन’ पुरस्कार (महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी), तीन ‘कृषीविषयक’ पुरस्कार, ‘उत्तम विज्ञान पुस्तक’ पारितोषिक इत्यादींचे वितरण होईल. तसेच मविपतर्फे तीन इ-पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येईल. प्रा. सुनील भागवत हे ‘नवीन शैक्षणिक धोरण’ याविषयावर आपले विचार मांडतील.