एकोणसाठावे मराठी विज्ञान अधिवेशन, नांदेड

 मराठी विज्ञान परिषदेचे एकोणसाठावे मराठी विज्ञान अधिवेशन दि. ११, १२ व १३ जानेवारी २०२५ रोजी नांदेड येथे होणार आहे. अधिवेशनाचे स्थळ ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कँपस्, विष्णुपुरी नांदेड हे आहे.
अधिवेशनाचे अध्यक्षस्थान प्रा.अजित केंभावी (निवृत्त संचालक, आयुका) भूषवणार असून उदघाटन प्रा.सुनील भागवत (संचालक,आयसर पुणे) यांच्या हस्ते होणार आहे.
प्रतिनिधी नोंदणीची अंतिम तारीख दि. ३० डिसेंबर २०२४ ही आहे. सोबत जोडलेल्या अर्जात आवश्यक माहिती भरून नोंदणी करणाऱ्या प्रतिनिधीने पाठवावी.
संपर्कसाठी इमेल :mvpnavinnanded@gmail.com आणि भ्रमणध्वनी प्रा.संजय देऊळगावकर (कार्यवाह, मविप नवीन नांदेड विभाग) 9403962001