
या पुरस्कारासाठी पाच प्रवेशिका आल्या. सादरीकरण आणि प्रश्नोत्तरे झाल्यावर, इचलकरंजीचे जॅकार्ड निर्माते श्री.समीर नाईक यांची निवड २०२५ च्या पुरस्कारासाठी करण्यात आली. आय. सी. टी. मुंबई येथे १८ सप्टेंबर २०२५ रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या पुरस्काराच्या निवड समितीमध्ये परिषदेचे अध्यक्ष प्रा. ज्येष्ठराज जोशी, कार्यवाह श्री. अ. पां. देशपांडे आणि कार्यकारिणी सदस्य श्री. मकरंद भोंसले यांचा सहभाग होता.