मराठी विज्ञान परिषदेतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्त दिनांक १५फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४:०० ते ५:३० या वेळात कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कृत्रिम बुध्दिमत्ता मानवी जीवनातील एक क्रांती. एक महत्वाचा टप्पा, कृत्रिम बुध्दिमत्तेने आजच्या आपल्या जीवनात कळत- नकळत प्रवेश केला आहे. कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापराने सायबर गुन्हांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. कृत्रिम बुध्दिमत्ता आणि आपले दैनंदिन जीवन याविषयी बर्याच शंका, प्रश्न तुमच्या मनात असतील या कार्यक्रमाला उपस्थित राहून तुमच्या मनातील प्रश्न विचारा आणि AI संबंधी अधिक माहिती मिळावा.
या कार्यक्रमात श्री. वैभव पाटकर आणि श्रीमती गौरी देशपांडे हे एआय विषयतज्ञ व अभ्यासक या कार्यक्रमात सहभागी होणार असून, त्यामध्ये मुख्यत्वे एआयचा वापर करून सायबर गुन्हे कसे घडतात? यासंबंधी श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतील.
ठिकाण : मराठी विज्ञान परिषद , विज्ञान भवन, वि.ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई 400022
कार्यक्रम ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने होणारआहे.
https://us06web.zoom.us/j/86343637161?pwd=eJ8FcDPLtoc9CEbPJN6WUUZsmX42hx.1
Meeting ID: 863 4363 7161
Passcode: 944822