ग्रामीण भागात विज्ञान शिक्षण क्षेत्रात किमान दहा वर्षे कार्यरत संस्थेला हा पुरस्कार २०२३ सालापासून दिला जातो. यावर्षी सदर पुरस्कारासाठी चार प्रवेशिका आल्या होत्या. यासाठी परीक्षक म्हणून प्रा.सुधीर पानसे (माजी प्राचार्य साठ्ये महाविद्यालय), डॉ.रेखा वर्तक (निवृत्त वैज्ञानिक अधिकारी, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र) आणि श्री.दिलीप हेर्लेकर (कार्यवाह मविप) यांनी काम पाहिले. त्यांनी परीक्षण करताना विज्ञान शिक्षण क्षेत्रातील कामगिरी, इतर क्षेत्रात विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करून दिलेले योगदान, कार्याची पोहोच, उपयुक्तता आणि समाज मान्यता (पुरस्कार रूपाने) या निकषांचा अवलंब केला.
निवड केल्यानुसार “येरळा प्रोजेक्ट सोसायटी” (सांगली) या संस्थेची निवड सु.त्रिं.तासकर पुरस्कार २०२५ साठी करण्यात आली. हा पुरस्कार रू. १ लाख, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह या स्वरूपाचा आहे. पुरस्कार वितरण परिषदेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात रविवार दि.२७ एप्रिल, २०२५ रोजी करण्यात येईल.