महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात , किमान दहा वर्षे विज्ञान शिक्षणाचे कार्य करणाऱ्या संस्थेला पुरस्कार देण्याची ही योजना २०२३ सालापासून सुरू आहे. ‘तासकर परिवार विज्ञान प्रसार निधी’च्या व्याजातून हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप रु.१ लाख,सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे आहे.या पुरस्कासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी आपली माहिती(स्थापना, नोंदणी तपशील, कार्यक्षेत्र, कामाचे स्वरूप,गेल्या किमान तीन वर्षांतील सहभाग,निवडक छायाचित्रे, कात्रणे,संस्थेला मिळालेले पुरस्कार,इत्यादी) मराठी विज्ञान परिषदेकडे दि.२८ फेब्रुवारी २०२६ पर्यत पाठवावी.
पत्ता : मराठी विज्ञान परिषद,विज्ञान भवन, राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेसमोर, वि.ना.पुरव मार्ग, शीव- चुनाभट्टी (पूर्व) मुंबई – ४०००२२.
दूरध्वनी : (०२२) ४८२६ ३७५०/ ४८२६ ००९४ भ्रमणध्वनी : ९९६९१००९६१ (सकाळी ११ ते सायंकाळी ५, साप्ताहिक सुट्टी मंगळवार खेरीज)
इमेल : officer1.patrika@mavipa.org