साठावा वर्धापन दिन

मराठी विज्ञान परिषद  २४ एप्रिल २०२६ रोजी साठ वर्षे पूर्ण करत आहे. रविवार दि.२६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० यावेळात परिषदेच्या विज्ञान भवनात साठावा वर्धापन दिन कार्यक्रम होणार आहे. डॉ. अविनाश सुपे (माजी बृहन्मुंबई महापालिका वैद्यकीय शिक्षण संचालक व निवृत्त अधिष्ठाता, के. ई. एम. रूग्णालय) हे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. यावेळी परिषदेचे सु. त्रिं. तासकर पुरस्कार, सुधाकर उध्दवराव आठले पुरस्कार, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीचे ‘विज्ञान संशोधन पुरस्कार’ आणि उत्तम विज्ञान पुस्तक पारितोषिक वितरित करण्यात येतील. प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता होईल. सर्व विज्ञानप्रेमींना विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमाला जरूर उपस्थित राहावे.