The “Careers in Basic Sciences” program will be held by Marathi Vidnyan Parishad on May 10, 2026 (Time 10.30 am to 4.30 pm).
There are good career opportunities available in the basic sciences. In general, people are not aware of these career options, which are lucrative.
Since April 2014, Marathi Vidnyan Parishad has run a programme called “Careers in Basic Sciences” to enlighten students about prospects for higher education in the basic sciences and various educational institutions offering higher education.
This course covers mathematics, physics, chemistry, and Life Science. Students are guided and get their questions answered by subject experts.
Main Features : • Direct guidance from subject experts •Opportunity to ask questions and clear doubts • Exposure to career paths and top institutions •One-to-one interaction with experts

Parents or guardians are also eligible to participate in this course.
Please bring your lunch box.
No any fees for this programme
Date: 10th May 2026,
Time 10.30 am to 4.30 pm
| Time | Subject | Guidance |
| 10.30 to 11.00 | Registration and Introduction | |
| 11.00 to 12.15 | Life Sciences | Dr. Prashant Ratnaparakhi |
| 12.30 to 1.30 | Mathematics | Prof. Anushree Tambe |
| 2.15 to 3.15 | Physics | Dr. Shreeganesh Prabhu |
| 3.30 to 4.30 | Chemistry | Dr. Anant Kapadi |
Last Date of registration: 8th May 2026
Venue: Marathi Vidnyan Parishad, Vidnyan Bhavan, V.N. Purav marg, Sion-Chunabhatti (E), Mumbai 400 022.
Email: office@mavipa.org Website: www.mavipa.org
Phone: Office (022) 48260094 / 3750 Mobile : 9969100961,
How to Register: For registration, contact to Marathi Vidnyan Parishad’s office.
Marathi Vidnyan Parishad,
Vidnyan Bhavan, V. N. Purav Marg, Sion-Chunabhatti (E), Mumbai 400022
Phone: Office (022) 48260094 / 3750 Mobile : 9969100961,
‘मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या संधी‘
मराठी विज्ञान परिषदेद्वारे दिनांक १० मे २०२६ रोजी (वेळ सकाळी १०.३० ते सायं ४.३०) “मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या संधी” हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
मूलभूत विज्ञान शाखांमध्ये कारकिर्दीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. सहसा याबाबत लोकांना माहिती नसते, तसेच त्या कारकिर्दीही आकर्षक आहेत.
मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या शक्यता आणि उच्च शिक्षण देणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती मिळावी, यासाठी हा कार्यक्रम एप्रिल २०१४ पासून मराठी विज्ञान परिषद चालवत आहे.
या मार्गदर्शन वर्गात गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जैवविज्ञान हे विषय समाविष्ट आहेत. यात विषयतज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील, तसेच त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतील.
मुख्य वैशिष्ट्ये : •तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन • शंका निरसनाची संधी •करिअर व शिक्षणाच्या विविध पर्यायांची माहिती •तज्ज्ञांशी प्रत्यक्ष संवाद
विद्यार्थ्यांचे पालकदेखील या मार्गदर्शन वर्गात सहभागी होऊ शकतात.
सोबत येताना जेवणाचा डबा आणावा.
हा कार्यक्रम विनामुल्य आहे.
दिनांक १० मे २०२६
वेळ : १०.३० ते ४.३०
| वेळ | विषय | मार्गदर्शक |
| १०.३० ते ११.०० | नोंदणी आणि कार्यक्रम ओळख माहिती | |
| ११.०० ते १२.१५ | जैवविज्ञान | डॉ. प्रशांत रत्नपारखी |
| १२.३० ते १.३० | गणित | प्रा. अनुश्री तांबे |
| २.१५ ते ३.१५ | भौतिकशास्त्र | डॉ. श्रीगणेश प्रभू |
| ३.३० ते ४.३० | रसायनशास्त्र | डॉ. अनंत कापडी |
नोंदणीची अंतिम तारीख: ८ मे २०२४
स्थळ: मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
ई-मेल : office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org
दूरध्वनी : कार्यालय (०२२) ४८२६००९४ / ३७५०, मोबाईल : ९९६९१००९६१
नाव नोंदणी कशी कराल?
नाव नोंदणी करण्यासाठी कृपया मराठी विज्ञान परिषद कार्यालयाशी संपर्क साधावा.
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, चुनाभट्टी, मुंबई ४०००२२
दूरध्वनी क्र. : (०२२) ४८२६३७५० / ४८२६००९४