वैद्यकीय पुस्तक पारितोषिक

कोणासाठी? : प्रौढांसाठी

१) डॉ. रा.वि. साठे वैद्यकीय पुस्तक पारितोषिक २) डॉ. टी. एच. तुळपुळे वैद्यकीय पुस्तक पारितोषिक ३) डॉ. चंद्रकांत वागळे वैद्यकीय पुस्तक पारितोषिक

वैद्यक विषयावरील मराठी पुस्तकाच्या लेखनाला दर तीन वर्षांतून एकदा ही पारितोषिके देण्यात येतात.

अधिक माहिती 


व्ही. डी. चौगुले आणि मो. मु. मोहिले पारितोषिक

कोणासाठी? : विद्यार्थ्यांसाठी

दर तीन वर्षांनी भरविण्यात येणाऱ्या ‘राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलन’मध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी त्यांचे प्रकल्प सादर करतात. या संमेलनात, इयत्ता आठवी ते दहावी आणि इयत्ता अकरावी व बारावी, अशा दोन गटांतील विद्यार्थ्यांद्वारे सादर केल्या जाणाऱ्या प्रकल्पांतील प्रत्येकी तीन सर्वोत्तम प्रकल्पांना ही पारितोषिके दिली जातात.

अधिक माहिती


श्रीधर नारायण गोडबोले गणित पारितोषिक

गणित या विषयाचे नामवंत प्राध्यापक श्रीधर नारायण गोडबोले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २०१८ सालापासून ही पारितोषिके दरवर्षी दिली जातात. परिषदेच्या उपक्रमात सहभागी असणाऱ्या तीन शाळांतील शालान्त परीक्षेत गणितात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या प्रत्येकी एका विद्यार्थ्याला हे पारितोषिक देण्यात येते.


उत्तम विज्ञान पुस्तक पारितोषिक

 नाशिकच्या विज्ञान लेखक संघाने दिलेल्या देणगीच्या व्याजातून हे पारितोषिक २०२०सालापासून दिले जाते. नजिकच्या वर्षात  प्रकाशित  झालेले, मराठीतील उत्तम विज्ञान पुस्तक या पारितोषिकास पात्र ठरते.