रसायन दिन २०२६

भारताच्या रसायनशास्त्रातील प्रगतीमध्ये आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचे अमुल्य योगदान आहे.  त्यांनी भारतातील रसायन उद्योगाचा पाया रचला.  त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ त्यांचा जन्म दिवस २ ऑगस्ट हा  मराठी विज्ञान परिषदेतर्फे २००७ सालापासून नियमितपणे ‘रसायन दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी २ ऑगस्ट २०२६ रोजी रविवार असल्यामुळे सोमवार, दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी रसायन दिन साजरा केला जाणार आहे.

या दिनाचे औचित्य साधून शिक्षक, पालक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि  इतर प्रौढ व्यक्तींसाठी मराठी विज्ञान परिषदेने या कार्यक्रमांतर्गत दिनांक ३ ऑगस्ट २०२६  रोजी  स. १०.३० ते दु.  ३:३० या वेळेत मुंबई-माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेत ( Institute of Chemical Technology, Matunga- Mumbai)   भेट आयोजित केली आहे. सहभागींना रसायन तंत्रज्ञान संस्थेची सविस्तर माहिती, विद्यार्थ्यांना या संस्थेत प्रवेश घ्यावयाचा असल्यास काय कारणे अपेक्षित आहे, शिवाय तेथील अनेक प्रयोगशाळांपैकी तीन प्रयोगशाळा व गॅलरी  बघण्याची संधी मिळेल. शिक्षक-पालकांना या भेटीचा निश्चितच उपयोग होईल.  या कार्यक्रमात एकूण २५ व्यक्तींना सहभागी होता येईल. एका शाळेतून एकापेक्षा जास्त शिक्षक सहभागी होऊ शकतात. या भेटीसाठी रु.५०/- शुल्क आकारले  आहे.

इच्छुकांनी २७ जुलै २०२६ पर्यंत  शुल्क भरून नावनोंदणी निश्चित करावी. त्वरा करा, मर्यादित (फक्त २५) जागा. प्रथम नावनिंदणी करणार्‍यास प्राधान्य दिले जाईल.

सूचना:

  • सोमवार, दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता ‘रसायन तंत्रज्ञान संस्था’ माटुंगा, मुंबई (ICT, Mumbai) येथे गेटजवळ जमावे
  • जेवणाची सोय आहे
  • पूर्वनोंदणी अत्यावश्यक
  • शुल्क : रु.५०/- प्रति व्यक्ती

भेटीचे स्थळ:

रसायन तंत्रज्ञान संस्था, नाथालाल पारेख मार्ग, खालसा महाविद्यालयाच्या जवळ, माटुंगा (पू), मुंबई ४०००१९
Institute of Chemical Technology, Nathalal Parekh Marg, Near Khalsa College, Matunga East, Mumbai 400019

 

संपर्क :  दूरध्वनी : ०२२ ४८२६ ००९४, ०२२ ४८२६ ३७५०, मोबाईल : ९९६९१००९६१
ई-मेल : office@mavipa.org