मराठी विज्ञान परिषदेत गणित प्रदर्शन कक्ष चालू करण्यात येणार आहे. दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४: ०० वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.
२३ एप्रिल ते १५ जून २०२५ हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.
गणित हा दैनदिन जीवनातील महत्वाचा विषय. गणित म्हणजे आकडेमोड, मोजमापन असं वाटतं पण याच्याशिवाय बर्याच गोष्टी गणितात असतात. या प्रदर्शनात गणितातील प्रसिद्ध कोडी, संख्यांचे काही मजेदार खेळ, पत्यांच्या गणिती जादू , लंबकाच्या झोक्याचं गणित, अशा विविध गोष्टी मांडल्या आहेत. गणित प्रदर्शनाबरोबरच गणितावर काही लघुपट/ स्लाईड शो बघायला मिळतील. या गणित प्रदर्शनाला अवश्य भेट द्या. गणिताबद्दल अधिकाधिक माहीती घेऊन जा.