‘खेळणी करु या – विज्ञान जाणू या’

हा कार्यक्रम दिनांक २९ जून २०२३ रोजी सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत विज्ञान भवनात  आयोजित केला आहे.

इयत्ता ५ वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांसाठी  असणाऱ्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना साहित्य दिले जाईल. त्या  साहित्याद्वारे ध्वनी, गुरुत्वमध्य, स्थितीज उर्जा – गतिज उर्जा या विज्ञान संकल्पनांवर खेळणी तयार करण्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले जाईल. त्याचवेळी खेळण्यामागील वैज्ञानिक तत्व समजावून दिले जाईल. तसेच दैनंदिन जीवनामध्ये ते तत्व कोठे वापरले जाते याबातही मार्गदर्शन केले जाईल. विद्यार्थ्यांनी  तयार केलेली खेळणी त्यांना घरी नेता येतील. कार्यक्रम मराठी आणि इंग्रजी अशी दोन्ही माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आहे.

शुल्क – रु. १५०/- फक्त (कार्यक्रमाचे शुल्क प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन भरता येईल)

विद्यार्थ्यांनी आणावयाचे साहित्य –  सेलोटेप, कात्री, स्केचपेन, फेव्हिकॉल

अधिक माहितीसाठी  संपर्क आणि स्थळ :

मराठी विज्ञान परिषद,  शीव – चुनाभट्टी, मुंबई ४०००२२.

दूरध्वनी : (०२२) २४०५ ४७१४ /२४०५ ७२६८.

इ-मेल : office@mavipa.org

विशेष: कार्यक्रम इयत्ता ५वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी असला तरी सर्व गटातील व्यक्ती  सहभागी होऊ  शकतात.