कथा एका वैज्ञानिक वीरांगनेची!

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने, मराठी विज्ञान परिषद आयोजित कार्यक्रम कथा एका वैज्ञानिक वीरांगनेची!

दोन नोबेल पुरस्कार विजेत्या, परंतु व्यक्तिगत आयुष्यात प्रेमळ पत्नी आणि माता म्हणून भूमिका बजावणाऱ्या, सामाजिक भान जपणाऱ्या आणि वेळप्रसंगी देशासाठी युद्धामध्ये सहभागी होणाऱ्या एका वैज्ञानिक वीरांगनेची कथा! तिने लावलेल्या विस्मयजनक शोधांची आणि नंतर रणांगणावर केलेल्या चित्तथरारक कामगिरीची कहाणी!

ही कहाणी सांगणार आहेत ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. मानसी राजाध्यक्ष

दिनांक : ९ मार्च २०२४   वेळ : दुपारी ३ ते ४

स्थळ : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव  मार्ग

सर्व विज्ञानप्रेमींना आग्रहाचे निमंत्रण!