महिला दिन विशेष व्याख्यान – महिलांचे मानसिक आरोग्य

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानेमहिला दिन विशेष व्याख्यान

विषय : महिलांचे मानसिक आरोग्य

वक्त्या : डॉ. मितल कल्पेश खैरनार

दिनांक : ७ मार्च २०२६ – वेळ : संध्याकाळी ४ ते  ५
स्थळ : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग,चुनाभट्टी, मुंबई ४०००२२

महिलांच्या आरोग्यात मानसिक संतुलनाला सर्वाधिक महत्त्व आहे.
दैनंदिन ताण-तणाव, कामाचा ताण, नाती-संबंध, भावनांचे व्यवस्थापन, आणि यातून स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे तारेवरची कसरत!  हे सगळं हाताळताना मनावर मोठा भार पडतो.

हा  भार कमी  करण्यासाठीचे उपाय या व्याख्यानात जाणून घ्या :

  • स्वत:चे व कुटुंबाचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी आयुर्वेदाचे महत्व
  • मन शांत ठेवण्यासाठी रोजच्या सवयी
  • ताण-तणाव कमी करण्याच्या सोप्या पद्धती – योग-प्राणायाम मार्गदर्शन
  • भावनांचे व्यवस्थापन (Emotional Management) / नातेसंबध सांभाळण्याचे तंत्र
  • स्वतःची काळजी(Self-care) कशी घ्यावी?

विशेष निमंत्रण सर्व महिलांसाठी!
स्वतःसाठी थोडा वेळ काढा…  आपले मनही तितकेच महत्त्वाचे आहे!