मराठी विज्ञान परिषदेचा एकोणसाठावा वर्धापन दिन रविवार दि. २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत परिषदेच्या विज्ञान भवनात साजरा केला जाईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अजित केंभावी (निवृत्त संचालक, आयुका, पुणे) हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात ‘सु.त्रिं. तासकर पुरस्कार’, ‘सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार’, तीन ‘विज्ञान संशोधन स्पर्धे’चे पुरस्कार (महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीचे) आणि ‘उत्तम विज्ञान पुस्तक पारितोषिक’ यांचे वितरण होईल. तसेच परिषदेच्या तीन इ-पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येईल. प्रा. अजित केंभावी ‘विश्वाची बाल्यावस्था – जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीच्या नजरेतून’ या विषयावर व्याख्यान देतील. सर्व विज्ञानप्रेमींनी या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची नोंद घ्यावी आणि उपस्थित राहावे ही विनंती!