प्रा. मन मोहन शर्मा विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार – २०२३

अध्यापनासह गुणवत्तापूर्ण संशोधन करणाऱ्या अशा महाविद्यालयातील आणि विद्यापीठातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्याकरिता मराठी विज्ञान परिषदेची प्रा. मन मोहन शर्मा विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार  ही  योजना आहे.  यावर्षी (२०२३) या पुरस्कारासाठी  विद्यापीठ स्तरावरील पाच नामांकने व महाविद्यालयीन स्तरावरील दहा नामांकने प्राप्त झाली होती.

पुरस्कारासाठी योग्य व्यक्ती निवडण्यासाठी दिनांक २८ ऑक्टोबर २०२३रोजी शोध-अन्- निवड समितीची सभा झाली.  यावर्षीच्या उमेदवारांची गुणवत्ता व त्यांची कामगिरी यांनी समिती अतिशय प्रभावित झाली. समितीने एकमताने केलेल्या शिफारशी अनुसार पारितोषिके पुढीलप्रमाणे देण्यात येतील.

विद्यापीठ स्तरावरील पारितोषिक (एकूण रुपये एक लाख)  पुढील दोघांना विभागून देण्यात येईल. (नावांचा क्रम आकारविल्हे अनुसार)
१) डॉ. तुकाराम डी. डोंगळे –(स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
२) प्रा. अनंत कापडी – (इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, नाथालाल पारेख रोड, माटुंगा)

महाविद्यालयीन स्तरावरील पारितोषिकाची एकूण रक्कम यावर्षी २,००,००० /- (रुपये दोन लाख) करण्यात येईल, व हे पारितोषिक पुढील चौघांना विभागून देण्यात येईल.  (नावांचा क्रम आकारविल्हे अनुसार)
१) डॉ. कीर्तीकुमार बडगुजर –(एसआयईएस कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, जैन लेन, सायन, मुंबई.)
२) डॉ. पुष्पिंदर कौर गुप्ता भाटिया –(गुरु नानक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, गुरु तेग बहदूर नगर, सायन, मुंबई.)
३) डॉ. वंदना निकम –(श्रीमती काशीबाई नवले फार्मसी कॉलेज, पुणे-सासवड रोड, कोंढवा (Bk), पुणे)
४) डॉ. जयप्रकाश संगशेट्टी –(वाय. बी. चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी, डॉ.रफिक झकेरिया कॅम्पस, रोझा बाग, संभाजीनगर)

मराठी विज्ञान परिषदेचे यावर्षीचे ५८वे अधिवेशन वाशी, नवी मुंबई या ठिकाणी होणार आहे. त्यात दिनांक ९ डिसेंबर रोजी ही पारितोषिके प्रदान करण्यात येतील.

सर्व पारितोषिक विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!