राष्ट्रीय गणित दिन

श्रीनिवास रामानुजन हे भारतातील प्रसिद्ध गणितज्ज्ञ,  २२ डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस. हा दिवस  संपूर्ण  भारतात ‘राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी  विज्ञान परिषदेत दरवर्षी गणित दिनाच्या  निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

गणित कृती वर्ग  या  कार्यक्रमात विद्यार्थ्यांना एक संच देण्यात येईल संचातील साहित्य वापरून विद्यार्थी गणितातील संकल्पनांवर  आधारीत कृती करतील.

गणित  प्रशिक्षण वर्ग  – या वर्गात गणितज्ञ शिक्षकांना गणितातील संकल्पना सोप्या करून  शिकवण्यासंबधी   मार्गदर्शन करतील.

हे दोन्ही  कार्यक्रम दिनांक १९ डिसेंबर २०२४  रोजी सकाळी ११ : ०० ते १:३०  या वेळात विज्ञान भवनात  संपन्न होतील.
दोन्ही कार्यक्रम निशुल्क आहेत.  कार्यक्रमाला येण्यापूर्वी खालील व्हॉटअ‍ॅपवर किंवा फोन नंबरवर नोंदणी करावी.
व्हॉट्सॅप क्र. : ९९६११९१९६१
दूरध्वनी क्र. ०२२ -४८२६३७५० / ४८२६००९४

ठीकाण : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि.ना. पुरव मार्ग, शीव चुनाभट्टी, मुंबई ४०००२२

या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. गणित विषय सोपा, मनोरंजक आणि दैनंदिन आयुष्याशी जोडलेला आहे याची अनुभूती घ्या.