डॉ. सी.व्ही रामन हे नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय वैज्ञानिक. त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराचा सन्मान म्हणून २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून भारतात सर्वत्र साजरा केला जातो. दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्व वाढावे त्याचा प्रसार, प्रचार व्हावा हा त्या मागचा मुख्य उद्देश आहे.
मराठी विज्ञान परिषदेतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी काही स्पर्धांचे आयोजन केले आहे.
स्पर्धेत सहभागी व्हा, बक्षीस मिळवा, विज्ञान रुजवा ………..
अधिक माहितीसाठी
१) चित्रकला स्पर्धा :- विषय निसर्गातील विज्ञान
दिनांक :- २० फेब्रुवारी २०२५ ठिकाण :- मराठी विज्ञान परिषद वेळ :- सकाळी ११:०० ते १:००
पहिला गट :- ६ वी आणि ७ वी चे विद्यार्थी दुसरा गट :- ८ वी आणि ९ वी चे विद्यार्थी
स्वरूप – ही स्पर्धा वरील दोन गटात घेण्यात येईल.
चित्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांना परिषदेकडून कागद देण्यात येतील. पेन्सिल, रंग, ब्रश तसेच इतर साहित्य विद्यार्थ्यांनी घरून आणायचे आहे. विद्यार्थ्यांनी कागदाच्या एका बाजूला चित्र काढून दुसर्या बाजूला या चित्रासंबंधी चार ते पाच वाक्यात वैज्ञानिक माहिती लिहीणे अपेक्षित आहे.
बक्षिसे :- प्रथम क्र. रु.५००/-,द्वितीय क्र. रु.३००/- तृतीय क्रमांक रु २००/-
२. शिक्षकांसठी विशेष स्पर्धा – विज्ञान प्रयोग पेटी तयार करणे
स्वरूप - ही स्पर्धा विज्ञान शिक्षकांसाठी आहे.
स्पर्धेचे नियम –
१) विज्ञान पेटीत एकापेक्षा जास्त संकल्पनेवर आधारित किमान १० आणि कमाल १५ प्रयोग असावेत.
२) विज्ञान पेटीत प्रयोगाचे लिखित साहित्य असावे.
३) विज्ञान प्रयोग पेटी + त्यातील साहित्य याची एकूण किंमत रु ५०० /-पेक्षा जास्त नसावी.
४) संच परिषदेत पाठवण्याचा अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२५
५) एका शाळेतील एकापेक्षा जास्त शिक्षक स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. परंतु प्रत्येकाची विज्ञान प्रयोग पेटी वेगवेगळी असेल.
बक्षिसे – प्रथम क्र. रु.१५००/-,द्वितीय क्र. रु.१२००/- तृतीय क्रमांक रु१०००/-
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे नोंदणी करा
क्लिक करा आपला गुगल फॉर्म पाठवा. १ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या कार्यक्रमाचा सांगता समारंभ असेल या कार्यक्रमात दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसे देण्यात येतील .