प्रा. मन मोहन शर्मा विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार (२०२५)

प्रा. मन मोहन शर्मा विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान संशोधनाची आवड निर्माण करावयाची असेल तर त्यांना शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी स्वत: संशोधन करायला हवे. अशा प्रकारे अध्यापनासह गुणवत्तापूर्ण संशोधनही  करणाऱ्या  महाविद्यालयातील आणि विद्यापीठातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्याकरिता मराठी विज्ञान परिषदेने ही पुरस्कार योजना २०१४ पासून सुरु केली आहे. केंद्र शासनाकडून वेतन अनुदान मिळत असलेल्या शैक्षणिक संस्था वगळून महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापीठे (ज्यात खाजगी आणि अभिमत विद्यापीठेही समाविष्ट आहेत), तसेच महाराष्ट्र राज्यात स्थित असलेली महाविद्यालये यातील शिक्षक-गण या पुरस्कारांसाठी विचारात घेतले जातात. विद्यापीठ स्तरावर एक व महाविद्यालयीन स्तरावर एक असे दरवर्षी दोन पुरस्कार दिले जातात.

पुरस्काराचे स्वरूप : भारतीय विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात, आणि त्यातही खास करून संशोधन क्षेत्रात,  ऋषितुल्य म्हणून गणल्या जाणाऱ्या प्रा. मन मोहन शर्मा,  निवृत्त संचालक, यु.डी.सी.टी, मुंबई (आत्ताची आय.सी.टी.,मुंबई) यांच्या नावे हे पुरस्कार देण्यात येतात. प्रत्येकी एक लाख रूपये रोख, सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कारांचे वितरण मराठी विज्ञान परिषदेच्या अ.भा. मराठी विज्ञान अधिवेशनात केले जाते.

संशोधन क्षेत्रे : जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भूशास्त्र, हवामानशास्त्र, सागरविज्ञान, खगोलशास्त्र, अभियांत्रिकी, गणित, वैद्यकीय, भौतिकशास्त्र आणि कृषिशास्त्र. (अर्थात हे विषय प्रामुख्याने दिले असले तरी, ही योजना या विषयांपुरती मर्यादित नाही.)

वयोमर्यादा : विद्यापीठीय प्राध्यापकांसाठी (डिसेंबर २०२५ अखेर) वयोमर्यादा ५० वर्षे आहे; तर ५५ पर्यंत वयोमर्यादा असलेले महाविद्यालयीन प्राध्यापक/ या पुरस्काराकरिता अर्ज करू शकतात.

अनुभव : किमान १० वर्षे अध्यापन करणारे प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/ सहाय्यक प्राध्यापक या पुरस्काराकरिता अर्ज करू शकतात.

अर्ज : संबंधित कागदपत्रे आणि आवश्यक त्या जोडणीसहित पूर्णपणे भरलेला अर्ज (फक्त पीडीएफ स्वरूपात) मराठी विज्ञान परिषदेकडे md@mavipa.org या इमेलवर दि. ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत पाठवावा.

नामांकन अर्ज डाऊनलोड करा

Information in English


प्रा. मन मोहन शर्मा

थोडक्यात परिचय

प्रा. मनमोहन शर्मा म्हणजे ‘रसायन तंत्रज्ञान’ आणि ‘अभियांत्रिकी’ या विषयांच्या      संशोधनामधील एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व. शैक्षणिक संस्थांमध्ये, कमीत कमी संसाधने वापरून अत्याधुनिक आणि उच्चदर्जाचे संशोधन कसे करावे याचे ते एक अत्यंत यशस्वी आणि आदर्श उदाहरण आहेत. अध्यापन करीत असतानाच, उच्च दर्जाचे संशोधन करणाऱ्या भारतातील प्रतिथयश रसायन अभियंत्यांमध्ये प्रा. मन मोहन शर्मांचा समावेश आहे.

त्यांच्या मल्टीफेज रीअॅक्टर्स, आणि अन्य रासायनिक भट्ट्यांशी संबंधित संशोधनातील योगदानाने, त्या विषयाला नव-नवीन आयाम प्राप्त झाले आहेत. त्यांच्या पथदर्शी संशोधनकार्याकरिता त्यांना असंख्य मान- सन्मान प्राप्त झाले आहेत. रॉयल सोसायटीचे फेलो, भारताच्या राष्ट्रपतींकडून पद्मभूषण आणि पद्मविभूषण, यूएस नॅशनल अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे परदेशी सदस्य, रॉयल अकादमी ऑफ इंजिनिअरिंगचे आंतरराष्ट्रीय फेलो, थर्ड वर्ल्ड अॅकॅडमी ऑफ सायन्सेसची फेलोशिप आणि इंडियन नॅशनल सायन्स अकादमीचे अध्यक्ष ही त्यापैकी मोजकी आणि उल्लेखनीय उदाहरणे आहेत.

प्रोफेसर शर्मा यांनी त्यांचे संपूर्ण संशोधन मुंबई विद्यापीठात केले आहे. १९६४ साली,  वयाच्या केवळ २७व्या वर्षी, तत्कालीन यु.डी.सी.टी, मुंबई (आत्ताची आय.सी.टी.,मुंबई) येथे पूर्ण प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर केवळ तीन वर्षात त्यांच्या पहिल्या विद्यार्थ्याने पीएच.डी. पदवी संपादन केली,  हा एक विक्रमच म्हणावा लागेल. त्यांचे म्हणणे आहे की, दर्जेदार संशोधनासाठी आवश्यक असणारे घटक म्हणजे नाविन्यपूर्ण कल्पना, मजबूत प्रेरणा, एकाग्रता आणि कठोर परिश्रम करण्याची क्षमता! आपल्या कर्तृत्वातून त्यांनी हे सिद्ध केलेच आहे. तसेच निवृत्तीपर्यंत ते पदवीपूर्व विद्यार्थ्यांकरिता अध्यापन करीत होते; आणि एक शिक्षक असल्याचा त्यांना नेहमीच अभिमान वाटत आला आहे.


Prof. Man Mohan Sharma Awards for Science and Technology 2025

Promoting research culture among our educational institutions is undoubtedly the need of the hour. ‘Marathi Vidnyan Parishad’ has taken many initiatives in that direction. One initiative among them is ‘Prof. Man Mohan Sharma Awards for Science and Technology’. The awards are for teachers in the universities (including private and deemed to be universities) and affiliated colleges, who are doing high quality research in their educational institutes in Maharashtra. Any member of teaching faculty in a college, affiliated to a State University in Maharashtra, or in a department of a (state / deemed to be) university situated in Maharashtra (excluding those educational/ research institutions or universities which receive their salary grants from the Central Government) is eligible to apply.

Each award comprises Rs.1,00,000/– (Rupees One Lakh) and a citation each. The awards are named after Prof. Man Mohan Sharma, Former Director, UDCT, Mumbai (now, ICT).

Research Areas include (but not restricted to): Biological, Chemical, Earth, Atmosphere, Ocean and Planetary, Engineering, Mathematical, Medical, Physical Sciences, and Agriculture.

Age limit is 50 years for a university teacher and 55 years for a college teacher (as on 31 Dec, 2025).

Experience: Teaching experience of minimum 10 years is eligible.

Application : The application duly filled in shall be submitted, along with significant publications of the nominee, latest by 31st August 2025, in PDF format to Marathi Vidnyan Parishad at md@mavipa.org. For more details, do visit at   www.mavipa.org

Download nomination form

मराठीमध्ये माहितीसाठी