मराठी विज्ञान परिषद आणि जलवर्धिनी प्रतिष्ठान आयोजित
वर्षा जलसंचयन प्रमाणपत्र अभ्यासक्रम
(रेन वॉटर हार्वेस्टिंग सर्टिफिकेट कोर्स)
रविवार दिनांक २ फेब्रुवारी,२०२५ पासून पुढील आठ आठवडे
दर रविवारी दुपारी २ ते सायंकाळी ६
स्थळ – मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि.ना.पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२.
फोन – ९९६९१००९६१
प्रत्यक्ष आणि दूरदृष्य माध्यमाद्वारे (ऑन लाईन)
शुल्क – रु. ५०००/-
प्रवेश –
- इंजिनिअरींग पॉलिटेक्निक आणि डिग्री कॉलेजचे विद्यार्थी व प्राध्यापक,
- हाउसिंग सोसायट्यांचे सभासद,पर्यावरण विज्ञान, अभियांत्रिकी सामाजिक
- विज्ञानाचे विद्यार्थी तसेच शेती महाविद्यालय, आर्किटेक्टचे विद्यार्थी व अन्य कोणीही.
यात वर्षा जलसंचयन, व्यवस्थापन, देखभाल, डिझाईन, शहरी आणि ग्रामीण भागातील साठवणूक व साठवलेल्या पाण्याचा वापर, बोअर वेलचे (विंधण विहीर) पुनर्भरण व विहिरीचे पुनर्भरण, सरकारी धोरणे, फेरोसिमेंट सिमेंट तंत्रज्ञान वापरून पाणी साठवण व नैसर्गिक धाग्यांचा वापर करून पाणी साठवण, रस्ते व महामार्गावर पडणा-या पावसाच्या पाण्याची साठवणूक हे भाग शिकवले जातील.