राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा – २०२३

मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षापासून म्हणजेच २०१५ पासून मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी विज्ञान एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येते. शैक्षणिक आणि खुल्या अशा दोन गटांत घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेत विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कोणत्याही विषयावर आधारलेली एकांकिका सादर करता येते.

राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेचे हे नववे वर्ष असून प्रतिवर्षीप्रमाणे मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‘राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा २०२३’ आयोजित करण्यात येत आहे. ‘वैज्ञानिक आणि शोध’ (कथेमध्ये वैज्ञानिकाने केलेले संशोधन त्यामध्ये त्यांना आलेल्या अडचणी, त्याचे निवारण व लावलेला शोध  यावर विशेष भर असावा), ‘विज्ञान कथा’, वैज्ञानिक दृष्टिकोन असे विषय या विज्ञान एकांकिका स्पर्धेत हाताळले जाऊ शकतात. यात अंधश्रद्धा, सण आणि त्यामागील विज्ञान हे विषय वगळले आहेत. या वर्षीपासून पुन्हा स्पर्धेची प्राथमिक व अंतिम फेरी प्रत्यक्ष सादरीकरणाने होईल. ही स्पर्धा पूर्वीप्रमाणे शैक्षणिक व खुल्या अशा दोन गटात होईल.

शैक्षणिक गट : (इयत्ता आठवी ते बारावी)

खुला गट : वरिष्ठ महाविद्यालय (वयाची अट नाही) आणि नाट्यसंस्था.

प्रवेशिका व प्रवेश शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक : १० सप्टेंबर, २०२३.

प्रवेशिका पाठवण्यासाठीची सूचना

१) सर्वप्रथम प्रवेश शुल्क रु. ५००/- रकमेचा ऑनलाइन भरणा करावा.

२) त्यानंतर प्रवेशिका पुढे दिलेल्या इ-मेल आयडीवर पाठवावी. ekankika@mavipa.org

प्राथमिक फेरी ऑक्टोबर २०२३मध्ये होईल त्याची विभागीय केंद्रे योग्य वेळी कळविली जातील.


प्राथमिक फेरी

  • एकांकिका सादरीकरणाचा कालावधी ३० ते ४० मिनिटे
  • प्रत्यक्ष रंगमंचावर एकांकिका सादर करणार्‍या कलाकारांची संख्या २ ते १० व्यक्ती / विद्यार्थी
  • प्राथमिक फेरी ही विभागीय पद्धतीनेच घेतली जाईल. स्पर्धेचे परीक्षण ३ जणांचे परीक्षक मंडळ करेल.
  • या फेरीत स्पर्धकांनी त्यांची एकांकिका कुठल्याही तांत्रिक सहकार्याशिवाय सादर करावी. (नेपथ्य, प्रकाश, वेशभुषा)
  • प्राथमिक फेरीत कोणत्याही केंद्रावर प्रत्येक गटात कमीत कमी ३ स्पर्धक संस्था असतील तरच त्या गटासाठी स्पर्धा           घेतली जाईल. त्यापेक्षा कमी संख्या असल्यास प्राथमिक फेरीसाठी प्रयोग करण्याची परवानगी दिली जाईल पण त्यातून अंतिम फेरीसाठी निवड होईलच असे नाही.
  • प्राथमिक फेरीतील विभागांनुसार प्रत्येक विभागातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तीन क्रमांक काढले जातील           प्रत्येक विभागातून पहिल्या क्रमांकाच्या एकांकिकेची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात येईल. तथापि, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
  • प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या कलाकारांना (प्रत्यक्ष रंगमंचावर सादर करणारे कलाकार, लेखक, दिग्दर्शक) सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. प्राथमिक फेरीत सर्व केंद्रांवरील प्रत्येक गटातून तीन संघांची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या संघांना तसे प्रमाणपत्र देण्यात येईल.

प्राथमिक फेरीसाठीची पारितोषिके – गटानुसार प्रत्येक विभागातून

प्रथम क्रमांक     रु. ३,०००/-

द्वितीय क्रमांक    रु. २,०००/-

तृतीय क्रमांक    रु. १,०००/-


अंतिम फेरी

  • प्रत्यक्ष रंगमंचावर एकांकिका सादर करणार्‍या कलाकारांची संख्या २ ते १० व्यक्ती / विद्यार्थी
  • अंतिम फेरीत एकांकिका सादरीकरणासाठी एक तास १० मिनिटांचा कालावधी दिला जाईल. या कालावधीत स्‍पर्धक संघाने नेपथ्‍य, प्रकाशयोजना या सर्व तांत्रिक बा‍बी पूर्ण करणे, प्रयोग सादर करणे आणि सादरीकरणानंतर रंगमंच मोकळा करणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्‍यक्ष नाटयप्रयोग ३० मिनिटांपेक्षा कमी आणि ४० मिनिटांपेक्षा जास्‍त असू नये याची स्‍पर्धकांनी नोंद घ्‍यावी.
  • नोव्हेंबर अखेर मुंबईत प्रत्यक्ष रंगमंचावरील सादरीकरणाद्वारे होईल. त्या संबंधीची नियमावली अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या संस्थांना कळवली जाईल.
  • आयोजकांतर्फे प्रकाश योजनेसाठी ६ स्पॉटलाइट व १८चा डिमर बोर्ड विनामूल्य दिला जाईल.
  • नेपथ्यासाठी दरवाजाची १ चौकट, १ खिडकी, ४ ठोकळे, ६×४×९ एक लेव्हल, ६×४×१८ एक लेव्हल  विनामुल्य दिली जाईल
  • या व्यतिरिक्त नेपथ्य व प्रकाश योजना यासाठी आवश्यक त्या गोष्टी सशुल्क उपलब्ध करून दिल्या जातील. मात्र अंतिम फेरी अगोदर कमीत कमी एक वडा तसे कळवावे लागेल
  • कोणत्याही कलाकृतीचे / एकांकिकेचे रंगमंचीय सादरीकरण करण्यासाठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. यासाठी मंडळात पैसे भरल्याची  पावती, प्रवेशिका व इतर कागदपत्रे मराठी विज्ञान परीषदेकडे    पाठवणे आवश्यक आहे. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचा पत्ता, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, विदेश डाक      भवन, एस. एस. गुलाम मार्ग, दुभाष हाऊसच्या मागे, बॅलार्ड  इस्टेट, मुंबई, ४००००१.

अंतिम फेरीतील पारितोषिकप्राप्त एकांकिका मराठी विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावर, युट्यूबवर तसेच फेसबूकवर प्रसारित केल्या जातील याची नोंद लेखक आणि स्पर्धक संस्थांनी घ्यावयाची आहे. अंतिम फेरीचे प्रत्यक्ष चित्रीकरण केले जाऊन त्याचे प्रक्षेपण प्रयोग चालू असताना मराठी विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावर, युट्यूबवर तसेच फेसबूकवर केले जाईल.

  • स्पर्धा संयोजक         :         रवींद्र ढवळे       ९९२०५७२९७४
  • स्पर्धा समन्वयक       :         सुचेता भिडे       ९२७१५०१३६३
  • मविप कार्यवाह        :         दिलीप हेर्लेकर   ७०४५४१३७७२

 

अंतिम फेरी सांघिक पारितोषिके

  1. प्रथम क्रमांक          रु. ३१,०००/-
  2. द्वितीय क्रमांक         रु. २१,०००/-
  3. तृतीय क्रमांक          रु. ११,०००/-

 

पहिल्या तिन्ही संघांना मराठी विज्ञान परिषदेचे स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.

वैयक्तिक पारितोषिके

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी         रु. ३०००/-
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता     रु. २०००/-
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री     रु. २०००/-
  • सर्वोत्कृष्ट नेपथ्य        रु. २०००/-
  • सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना         रु. २०००/-
  • सर्वोत्कृष्ट संगीत        रु. २०००/-
  • सर्वोत्कृष्ट लेखन        रु. २,५००/-

(यावर्षीच्या स्पर्धेसाठीच लिहिल्या गेलेल्या एकांकिकेला दिले जाईल त्यासाठी रंगभूमि परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे).

आपल्या सोईसाठी पुढील दोन पत्रके जोडीत आहोत.