प्रतिवर्षीप्रमाणे ‘मराठी विज्ञान परिषदे’तर्फे राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा – २०२४” आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेचे हे दहावे वर्ष असून, हे नमूद करताना आनंद होत आहे. शैक्षणिक आणि खुला अशा दोन गटांत होणाऱ्या ह्या स्पर्धेसाठी विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कोणत्याही विषयावर आधारलेली एकांकिका सादर करता येते.
एकांकिकेमध्ये ‘वैज्ञानिक आणि शोध’ (कथानकामध्ये) वैज्ञानिकाने केलेले संशोधन त्यामध्ये त्यांना आलेल्या अडचणी यावर विशेष भर असावा, ‘विज्ञान कथा’, ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ असे विषय ह्या विज्ञान एकांकिका स्पर्धेत हाताळले जाऊ शकतात. अंधश्रद्धा, पर्यावरण, सण आणि त्यामागील विज्ञान हे विषय यातून वगळले आहेत. स्पर्धा प्राथमिक व अंतिम अशा दोन फेऱ्यात होईल.
शैक्षणिक गट : इयत्ता सातवी ते बारावीचे विद्यार्थी, खुला गट : वरिष्ठ महाविद्यालय (वयाची अट नाही) आणि नाट्यसंस्था
प्राथमिक फेरी-प्रवेशिका पाठविण्यासाठीच्या सूचना :
- दिलेल्या संकेतस्थळावर www.mavipa.org स्पर्धेची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
- ऑनलाईन प्रवेशशुल्क ₹ ५००/- भरावे. त्यानंतर प्रवेशिका डाऊनलोड करून घ्यावी. प्रवेशिकामध्ये योग्य माहिती भरून मविपकडे ई-मेलने ekankika@mavipa.org अथवा कुरिअरने पाठवावी.
- प्रवेशिका भरण्याचा अंतिम दिनांक – २६ ऑगस्ट, २०२४
- प्राथमिक व अंतिम फेरीचे परीक्षण प्रत्यक्ष सादरीकरणाने होईल. प्राथमिक फेरी सहभागी संस्थांच्या संख्येनुसार मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक / नागपूर अशा विविध केंद्रावर होईल.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत –
- प्राथमिक फेरीसाठी सादरीकरण करताना जुजबी नेपथ्य वापरता येईल, मात्र प्रकाश योजना करता येणार नाही. नेपथ्य व प्रकाश योजनेचे आराखडे देता येतील.
- प्राथमिक फेरी विभागीय पद्धतीने साधारणपणे २० ते २५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत घेतली जाईल. दोन जणांचे परीक्षक मंडळ असेल, ज्यात रंगभूमी आणि वैज्ञानिक क्षेत्रातील मान्यवर असतील.
- प्राथमिक फेरीतील सादरीकरणापूर्वी लेखकाची परवानगी / कलाकारांची यादी, एकांकिकेची संहिता यांच्या तीन प्रती आवश्यक आहे.
- अंतिम फेरीतील सादरीकरणासाठी स्पर्धक संस्थाना १ तास १० मिनिटांचा कालावधी दिला जाईल. या कालावधीत स्पर्धक संघाने नेपथ्य, प्रकाश योजना, इतर सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करणे आणि सादरीकरणानंतर रंगमंच मोकळा करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्ष एकांकिका सादरीकरणाचा कालावधी कमीत कमी ३० मिनिटे आणि जास्तीत जास्त ४० मिनिटे असेल.
- प्रत्यक्ष रंगमंचावर एकांकिका सादर करणार्या कलाकारांची संख्या २ ते १० विद्यार्थी / व्यक्ती एवढीच असावी. मुख्याध्यापक / संघप्रमुख / संस्थाप्रमुख / यांच्या मान्यतापत्राचा नमुना आणि लेखकाच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना संकेतस्थळावर दिला आहे.
प्राथमिक फेरीतील विभागांनुसार प्रत्येक विभागातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तीन क्रमांक काढले जातील. विभागात आलेल्या गटानुसारच्या प्रवेशिकांची संख्या कमी असेल तर तिन्ही पारितोषिके (प्राथमिक फेरीसाठी) देण्याचा वा कमी करण्याचा निर्णय मराठी विज्ञान परिषदेचा असेल. प्रत्येक विभागातून पहिल्या क्रमांकाच्या एकांकिकेची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात येईल. तथापि, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
अंतिम फेरी नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मुंबईत प्रत्यक्ष रंगमंचावरील सादरीकरणाद्वारे होईल. त्या संबंधीची नियमावली अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या संस्थांना त्वरित कळवली जाईल. अंतिम फेरीतील सादरीकरणापूर्वी रंगभूमी परीनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र अथवा सदर प्रमाणपत्रासाठी पैसे भरल्याची पावती आवश्यक आहे.
अंतिम फेरीतील पारितोषिकप्राप्त एकांकिका मराठी विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावर, युट्यूबवर तसेच फेसबूकपेजवर प्रसारित केल्या जातील, याची नोंद लेखक आणि स्पर्धक संस्थांनी घ्यावयाची आहे. अंतिम फेरीचे प्रत्यक्ष चित्रीकरण केले जाऊन त्याचे थेट प्रक्षेपण, प्रयोग चालू असताना मराठी विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावर, युट्यूबवर तसेच फेसबूकवर केले जाईल.
प्राथमिक व अंतिम फेरीत सादरीकरणात सहभागी होणाऱ्या सर्व संस्थांना, कलाकारांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
स्पर्धा संयोजक – श्री. रवींद्र ढवळे ९९२०५७२९७४, स्पर्धा समन्वयक – श्रीमती सुचेता भिडे ९२७१५०१३६३
कार्यवाह श्री. दिलीप हेर्लेकर / श्री. अ.पां. देशपांडे/ प्रा. भालचंद्र भणगे
प्राथमिक फेरीसाठीची पारितोषिके प्रत्येक विभाग आणि गटांसाठी
प्रथम क्रमांक : ₹ ३,०००/-, द्वितीय क्रमांक : ₹ २,०००/-, तृतीय क्रमांक : ₹ १,०००/-
अंतिम फेरी सांघिक पारितोषिके :
प्रथम क्रमांक : ₹ ३१,०००/-, द्वितीय क्रमांक, ₹ २१,०००/-, तृतीय क्रमांक : ₹ ११,०००/-
पहिल्या तिन्ही संघांना मराठी विज्ञान परिषदेचे स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.
वैयक्तिक पारितोषिके : सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी ₹ ३,०००/-, सर्वोत्कृष्ट अभिनेता ₹ २,०००/-,
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ₹ २,०००/-, सर्वोत्कृष्ट नेपथ्य ₹ २,०००/-, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना ₹ २,०००/-,
सर्वोत्कृष्ट संगीत ₹ २,०००/-, सर्वोत्कृष्ट लेखन ₹ २,५००/-
लेखनाचे पारितोषिक यावर्षीच्या स्पर्धेसाठीच लिहिल्या गेलेल्या एकांकिकेला दिले जाईल. त्यासाठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र, अथवा रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाकडे सदर संहिता परीक्षणासाठी दिल्याची पावती सादर करणे आवश्यक आहे.
कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, ‘विज्ञान भवन’,
वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी क्र. ०२२ ४८२६ ३७५०/ ४८२६ ००९४,
इ मेल : ekankika@mavipa.org / संकेतस्थळ www.mavipa.org
माहितीकरिता नमुना म्हणून काही पुस्तकांची नावे आणि संकेतस्थळे खाली देत आहोत –
१. विज्ञानयात्री डॉ. अनिल काकोडकर : अ.पां. देशपांडे व श्रीराम मनोहर, राजहंस प्रकाशन
२. विज्ञानयात्री डॉ. माधव चितळे : अ.पां. देशपांडे, राजहंस प्रकाशन
३. विज्ञानयात्री डॉ. माधव गाडगीळ : अ.पां. देशपांडे, राजहंस प्रकाशन
४. विज्ञानयात्री डॉ. वसंत गोवारीकर : अ.पां. देशपांडे, राजहंस प्रकाशन
५. डॉ. माशेलकर बौद्धिक संपदेचा उद्गाता : अ.पां. देशपांडे, ग्रंथाली
६. अज्ञात आइन्स्टाइन : बाळ फोंडके (अनुवाद : सुहासिनी अग्निहोत्री), मनोविकास प्रकाशन
७. अग्निपंख : ए. पी. जे. अब्दुल कलाम (अनुवाद : माधुरी शानभाग), राजहंस, प्रकाशन
८. कणाद ते कलाम : रंजन गर्गे, परममित्र प्रकाशन
९. मारी क्यूरी : अश्विनी भिडे-देशपांडे, ग्रंथाली
१०. भारतीय गणिती : ना.ह. फडके, वरदा प्रकाशन
११. नोबेल-विज्ञानवती : चित्रा नित्सुरे, नवचैतन्य प्रकाशन
१२. गणकचक्र चूडामणि भास्कर : मोहन आपटे, राजहंस प्रकाशन
१३. प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधक : भालबा केळकर, डायमंड प्रकाशन
१४. लीझ माईट्नर : वीणा गवाणकर, राजहंस प्रकाशन
१५. भारतीय शास्त्रज्ञ : डॉ. सी. व्ही. रामन : डॉ. प्रभाकर कुंटे, पॉप्युलर प्रकाशन
१६. रामानुजन जीनियस गणितज्ञ : डॉ. द.व्यं. जहागीरदार, राजहंस प्रकाशन
१७. होमी भाभा : चिंतामणी देशमुख, ग्रंथाली
१८. जगदीशचंद्र बसू : दिलीप कुलकर्णी, राजहंस प्रकाशन
१९. नाट्यातून विज्ञानाकडे… भाग १ ते ३ : डॉ. शरद पांडुरंग काळे, ग्रंथाली
२०. http://arvindguptatoys.com/arvindgupta/bs-marathi.pdf
२१. http://arvindguptatoys.com/arvindgupta/mar-kaprekar.pdf
विज्ञान कथा संग्रह
१. अंतराळातील भस्मासूर – डॉ. जयंत नारळीकर, श्रीविद्या प्रकाशन
२. व्हायरस – डॉ. जयंत नारळीकर
३. सॅप – माधुरी शानभाग, नवचैतन्य प्रकाशन
४. गुडबाय अर्थ – डॉ. बाळ फोंडके, मेहता पब्लिशिंग हाउस
५. कालवलय – डॉ. बाळ फोंडके, मेहता पब्लिशिंग हाउस
६. प्रेमाचा रेणू – डॉ. संजय ढोले, मेहता पब्लिशिंग हाउस
७. दुसरा कोलंबस – डॉ. द.व्यं. जहागीरदार, साहित्यसेवा प्रकाशन
८. वामनाचे चौथे पाऊल – सुबोध जावडेकर, मेहता पब्लिशिंग हाउस
९. दुसरा आइनस्टाइन – श्री. लक्ष्मण लोंढे
१०. प्रारंभ – डॉ. मेघश्री दळवी, सृजनरंग पब्लिकेशन
११.कल्पित-अकल्पित – श्रीमती सुधा रिसबूड, मेहता पब्लिशिंग हाऊस