भारतातील रसायन उद्योगाच्या प्रगतीमध्ये आचार्य प्रफुल्ल चंद्र रे यांचे अमुल्य योगदान आहे १८९६मध्ये रे यांनी मर्क्युरस नायट्रेटचा शोध लावला व प्रथमच भारतात १८९२मध्ये बेंगॉल केमिकल अँड फार्मास्युटिकल वर्क्स हा पहिला औषध निर्मितीचा कारखाना काढून भारतात रसायान उद्योगाचा पाया रचला. शिवाय, कोलकाता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले. त्यांनी ‘हिस्ट्री ऑफ केमिस्ट्री इन एन्शंट अँड मीडियावल इंडिया’ ग्रंथांचे संपादन केले. यांसारख्या त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल ‘२ ऑगस्ट’ हा त्यांचा जन्म दिन ‘रसायन दिन’ म्हणून साजरा केला जातो.
श्री. आनंद फुले यांनी दिलेल्या निधीच्या व्याजातून मराठी विज्ञान परिषद या कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. यावर्षी सर्वांना सोयीचे व्हावे म्हणून शनिवार, दिनांक ३ ऑगस्ट २०२४ रोजी ‘रसायन दिन’ आयोजित केला आहे.
- विशेषत: विद्यार्थ्यांसाठी आखणी केली आहे, पण पालक, शिक्षक सहभागी होऊ शकतात.
- कार्यक्रम मराठी आणि इंग्रजीतून घेतला जाईल.
- स्वत:ला प्रयोग करण्याची संधी मिळेल.
- सहभागींनी वही, पेन, नॅपकीन (प्रयोग करताना वापरण्यासाठी) आणि पाण्याची बाटली सोबत आणावी.
- वेळ: १०:३० ते १२:३० ( २ तास)
- नि:शुल्क , सर्वांसाठी खुला (१० वर्षांवरील सर्व)
- स्थळ : मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पूरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई ४०००२२
- गुगल फॉर्म भरून नाव नोंदणी करा. (नाव नोंदणी आवश्यक)
- नाव नोंदणीकरीता गुगल फॉर्म लिंक : येथे क्लिक करा
- अधिक माहितीसाठी संपर्क करा :
मविप कार्यालय – (०२२) – ४८२६ ३७५० / ४८२६ ००९४
मविप कार्यालय: ९९६९१००९६१ (सकाळी ११ ते सायं. ५)
इ-मेल : office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org