राष्ट्रीय गणित दिन २०२३

पार्श्वभूमी –  श्रीनिवास रामानुजन हे भारतातील एक निष्णात गणितज्ञ. २२ डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस. हा दिवस राष्ट्रीय गणित म्हणून साजरा करावा असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी २०१२ साली जाहीर केले तेव्हापासून भारतात २२ डिसेंबर राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी विज्ञान परिषदेत २०१३ सालापासून गणित दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण व्हावी. त्यांना गणितातील विविध संकल्पनांची माहिती व्हावी या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेत दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी ‘गणित कोडी’ या विषयावर शालेय विद्यार्थ्यांसाठी कृतीसत्राचे आयोजन केले आहे. कृतीसत्र विद्यार्थ्यांसाठी आहे तरीसुद्धा महाविद्यालयातील  विद्यार्थी  आणि प्रौढ व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. कार्यक्रम निशुल्क आहे.

या कृतीसत्रात सुडोकू आणि टॅनग्राम  या कोड्यावर तज्ज्ञांचे व्याख्यान, क्रियाशील कार्यक्रम असेल

सत्र १: अंककोडे – सुडोकू– मार्गदर्शक – डॉ. मेधा लिमये

सत्र २: भौमितिक आकृत्यांचा खेळ टॅनग्राम – मार्गदर्शन  – प्रा. माणिक टेंबे 

दिनांक : २२ डिसेंबर २०२३

वेळ : सकाळी १०:३०ते १: ३०

ठिकाण : मराठी विज्ञान परिष, विज्ञान भवन, वि.ना.पुरव मार्ग, शीव- चुनाभट्टी, मुंबई ४०००२२

संपर्क:  ०२२-४८२६००९४/३७५०  व्हॉट्सॅप क्र. ९९६९१००९६१