भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पुरस्कार 2024

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पुरस्कार

अभियांत्रिकीतील कोणत्याही शाखेत संशोधन करुन त्या संशोधनाचा प्रत्यक्ष उपयोग करणाऱ्या, चाळीस अथवा त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या अभियंत्याला हा पुरस्कार दिला जातो.

पुरस्काराचे नियम :

  • हा पुरस्कार मराठी विज्ञान परिषद पुरस्कृत असून भारतरत्न सरमोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ह्यांच्या नावे देण्यात येतो.
  • पुरस्काराचे स्वरूप ₹ १०,०००/-, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे.
  • या पुरस्कारासाठी भारतातील कोणताही अभियंता अर्ज करू शकतो.ऑनलाईन प्रवेशअर्ज भरण्याचा अंतिम दिनांक   १५ जुलै २०२४
  • पुढे दर्शवलेला ऑनलाईन प्रवेशअर्ज भरावा. यात  आपण केलेल्या कामाचे संक्षिप्त तसेच, विस्तृत सचित्र वर्णन असणे आवश्यक आहे. प्रवेशअर्जात इच्छुक उमेदवाराने संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे.
    ऑनलाईन प्रवेश अर्ज
  • पुरस्कार वितरण समारंभ १५ सप्टेंबरला २०२४ रोजी मुंबई अथवा महाराष्ट्रातील अन्य शहरातील एखाद्या अभियांत्रिकी महाविद्यालयात होईल. पुरस्कार वितरण समारंभात विजेत्याने ३० ते ४५ मिनिटे आपले काम पॉवर पॉईण्ट प्रेझेण्टेशनद्वारे सादर करणे आवश्यक आहे. विजेत्या व्यक्तीने स्वखर्चाने पुरस्कार वितरण समारंभाला उपस्थित राहावे.
  • आलेल्या प्रवेशिकांतून एका प्रवेशिकेची निवड मराठी विज्ञान परिषदेने नेमलेल्या समितीमार्फत केली जाईल व त्या समितीचा निर्णय अंतिम राहील.
  • अपवादात्मक परिस्थितीत वरील अट / अटी शिथिल करण्याचे अधिकार मराठी विज्ञान परिषदेकडे राहतील.

 

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे श्रेष्ठ स्थापत्य अभियंता होते. कर्नाटकातल्या चिक्क-बल्लापूर जिल्हातील मुद्देनहळ्ळी या गावी १५ सप्टेंबर, १८६१ रोजी त्यांचा जन्म झाला. १९०३मध्ये पुण्याला ते खडकवासला धरणावर असताना, त्यांनी पावसाळ्यात धरणामध्ये जास्त पाणी आल्याने धरण असुरक्षित होऊ नये म्हणून निर्माण केलेल्या स्वयंचलित स्लुईस गेट्स अद्वितीय ठरल्या व त्यानंतर ग्वाल्हेरच्या तिग्रा आणि म्हैसूरच्या कृष्णराज सागर धरणावर त्या वापरल्या गेल्या. १९०६मध्ये त्यांनी एडनला पाणी व सांडपाण्याची व्यवस्था करून दिली. हैदराबाद शहराला पूरनियंत्रण योजना तर केलीच पण एरवी जाणवणाऱ्या पाण्याच्या तुटवड्यासाठी उस्मानसागर आणि हुसेनसागर या तलावांची निर्मिती करून दिली, जी आजही उपयोगी पडते. विशाखापट्टणम येथे समुद्राच्या लाटांमुळे होणारी धूप त्यांनी थांबवली. बिहारमध्ये गंगेवरील मोकामा पुलासाठी त्यांनी काम केले. पुढे ते म्हैसूरचे दिवाण झाल्यावर त्यांनी कावेरी नदीवर कृष्णराज सागर धरण बांधले, म्हैसूर सोप  फॅक्टरी सुरू केली, म्हैसूर आयर्न अँड स्टील  फॅक्टरी सुरू केली,  पॅरॉसिटोल्ड  लॅबोरेटरी, बंगळुरुला जय चामराज पॉलिटेक्निक, कृषी विद्यापीठ, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बँक ऑफ म्हैसूर, म्हैसूर चेंबर ऑफ कॉमर्स, कन्नड परिषद अशा संस्था सुरू केल्या. त्यांच्या प्रेरणेने हिदुस्तान एअर क्राफ्ट आणि प्रीमिअर ऑटोमोबाईल या कंपन्या वालचंद हिराचंद ह्यांनी सुरू केल्या. त्यांना १९५५मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील इंस्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी  (पूर्वीची युडीसीटी) स्थापन करण्याच्या सल्लागार समितीत ते होते. अशा या देश घडवणाऱ्या अभियंत्याच्या जन्मदिनी म्हणजे १५ सप्टेंबर या दिवशी दरवर्षी राष्ट्रीय अभियंता दिन साजरा केला जातो.


Sir Mokshagundam Vishweshvarayya Award in Engineering 2024

The award is given to an Engineer, up to 40 years of age, in any discipline, who has conducted research and used that in practical application.

Rules for the award:

  1. This award is instituted by Marathi Vidnyan Parishad (MaViPa) and is given in the name of Bharat Ratna Sir Mokshagundam Visvesvaraya.
  2. The award will be 10,000/- and a memento with a citation.
  3. Any Engineer from India can apply for this award. The last date for filling online entry form is 15th July 2024
  4. Fill out the online application. It should include a concise summary of the work you have done, as well as a thorough description with illustrations. Interested candidate must fill complete information in the application form.
    Online application
  5. The award will be conferred on 15th September 2024 in one of the Engineering Colleges in Mumbai or any city of Maharashtra. The awardee will present a PowerPoint presentation of his work in 30 to 45 minutes at the award distribution ceremony. The awardee should attend the award ceremony at his/her own expense.
  6. A selection committee constituted will select the awardee from the entries received and its decision will be final.

Marathi Vidnyan Parishad has reserved the rights, under exceptional circumstances, to amend the rules.

Bharat Ratna Sir Mokshagundam Vishweshvarayya  was the Civil Engineer. He was born on September 15, 1861, in Mudenhalli village, Karnataka. In 1903, when he was on the Khadakvasla dam in Pune, he developed automatic sluice gate valves to prevent the dam from being unsafe due to floods; this became a unique of its kind and was subsequently used on Tighra Dam at Gwalior and Krishnaraja Sagar Dam, Mysore. In 1906, he provided water and sewage arrangements at Aden. While developing flood control schemes for the city of Hyderabad, he also constructed Osmanasagar and Hussainasagar lakes to handle the water scarcity; this is useful even today. He was instrumental in developing a system to protect Vishakhapattanam port from sea erosion. He worked for Bihar’s Mokam bridge on the Ganga River. Later, after being Diwan of Mysore, he built Krishnaraj Sagar dam on the Kaveri river, started the Mysore Soap Factory, started the Mysore Iron and Steel Factory, and institutes like Paracitold Laboratory, Jay Chamraj Polytechnic, Bangalore University, College of Engineering, Bank of Mysore, Mysore Chamber of Commerce, Kannad Council. With his inspiration, Walchand Hirachand started Hindustan Aircraft and Premier Automobile Companies. He was awarded the Bharat Ratna in 1955. He served on the advisory panel for the establishment of Mumbai’s Institute of Chemical Technology (formerly known as UDCT).