समाजामध्ये विज्ञान प्रसार तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याकरिता विविधप्रकारे प्रयत्न करणाऱ्या (किमान दहा वर्षे) व्यक्तीला मराठी विज्ञान परिषदतर्फे सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार देऊन गौरविले जाते.
पुरस्काराचे स्वरूप : रोख रुपये २५,०००/- आणि सन्मानपत्र
पुरस्कार प्रदान : एप्रिल २०२४ मध्ये होणाऱ्या परिषदेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात
वयोमर्यादा : ६० वर्षांपेक्षा (डिसेंबर २०२३ अखेर) कमी वय असलेल्या व्यक्ती या पुरस्काराकरिता अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : २८ फेब्रुवारी, २०२४ पर्यंत
संपर्क : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान, भवन, वि.ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२
दूरध्वनी : (०२२) ४८२६३७५०/४८२६००९४.
भ्रमणध्वनी : ९९६९१००९६१ (सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान, मंगळवार खेरीज)
इ-मेल : office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org