रसायन दिन
भारतातील रसायन उद्योगाच्या प्रगतीमध्ये आचार्य प्रफुल्ल चंद्र रे यांचे अमुल्य योगदान आहे. त्याबद्दल त्यांचा जन्म दिन ‘२ ऑगस्ट’ हा ‘रसायन दिन’ म्हणून साजरा केला जातो. २००७ सालापासून मराठी विज्ञान परिषदेत साजरा करण्यास सुरुवात झाली आणि त्यानिमित्ताने दरवर्षी रसायनशास्त्राशी संबधित कार्यक्रमांचे आयोजन प्रामुख्याने विद्यार्थी आणि शिक्षकांकरिता केले जातात. […]