विज्ञान/ गणितात पदव्युत्तर शिक्षण घेणार्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
महाविद्यालयात शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी तसेच मराठी विज्ञान परिषदेच्या कामाला हातभार लागावा या दुहेरी हेतूने विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना आखली होती. सन १९९४-९५ या वर्षापासून मुंबईतील विद्यार्थ्यांना या योजनेत संधी दिली. पुढे या उपक्रमाची व्याप्ती वाढवत मराठी विज्ञान परिषदेच्या विभागांना चक्रीय पद्धतीने सामावून घेण्यात आले. सन २०१६ पासून या योजनेचे स्वरूप बदलत एम.एससी भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / जीवशास्त्र / गणित, एम. ए. (गणित) ह्या अभ्यासक्रमाच्या महाराष्ट्रात शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याचे ठरले. त्यानुसार मूलभूत विज्ञानात उच्च शिक्षण घेण्यासाठी गरजू विद्यार्थ्यांना आधार आणि प्रोत्साहन मिळावे, हा या शिष्यवृत्ती योजनेचा हेतू आहे. […]